IPL 2022 Orange and Purple Cap : आयपीएलचा यंदाचा हंगाम समारोपाकडे वळला आहे. साखळी फेरीतील फक्त दोन सामने बाकी आहेत. आज सायंकाळी मुंबई आणि दिल्ली तर रविवावी पंजाब आणि हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. शुक्रवारी राजस्थान आणि चेन्नई यांचा सामना पार पडला. या सामन्यात यजुवेंद्र चहल याने भेदक मारा करत दोन विकेट घेतल्या. चहलने यासह आरसीबीच्या वानंदु हसरंगाला मागे टाकत पुन्हा एकदा पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. 

यजुवेंद्र चाहलने चौदा सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात चहल अव्वल क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा वानंदु हसरंगा आहे. हसरंगाने चौदा सामन्यात चोवीस विकेट घेतल्या आहेत. 

सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 5 गोलंदाज

क्रमांक गोलंदाज सामने विकेट सरासरी इकनॉमी रेट
1 युजवेंद्र चहल 14 26 16.53 7.67
2 वानिंदु हसरंगा 14 24  15.08 7.38
3 कगिसो रबाडा 12 22 16.72 8.36
4 उमरान मलिक 13 21 20.00 8.93
5 कुलदीप यादव 13 20 19.30 8.45

ऑरेंज कॅपवरही राजस्थानच्या जोस बटलरने कब्जा केला आहे. बटलरने  14 सामन्यात 48.38 सरासरीने आणि 146.96 या स्ट्राइक रेटने 629 धावा चोपल्या आहेत. बटलरला लखनौच्या राहुल आणि डिकॉक यांच्याकडून तगडे आव्हान मिळत आहे. 
सर्वाधिक धावा काढणारे टॉप पाच फलंदाज -

क्रमांक फलंदाज सामने धावा सरासरी स्ट्राइक रेट
1 जोस बटलर 14 629 48.38 146.96
2 केएल राहुल 14 537 48.82 135.26
3 क्विंटन डी कॉक 14 502 38.62 149.40
4 फाफ डु प्लेसिस 14 443 34.08 130.67
5 डेविड वॉर्नर 11 427 53.38 151.95

आयपीएल 2022 गुणतालिका-

क्रमांक संघ सामने विजय पराभव नेट रन रेट गुण
1 गुजरात टायन्स 14 10 4 0.316 20
2 राजस्थान रॉयल्स 14 9 5 0.298 18
3 लखनौ सुपर जांयट्स 14 9 5 0.251 18
4 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 14 8 6 -0.253 16
5 दिल्ली कॅपिटल्स 13 7 6 0.255 14
6 कोलकाता नाईट रायडर्स 14 6 8 0.146 12
7 पंजाब किंग्ज 13 6 7 -0.043 12
8 सनरायजर्स हैदराबाद 13 6 7 -0.230 12
9 चेन्नई सुपरकिंग्ज 14 4 10 -0.203 8
10 मुंबई इंडियन्स 13 3 10 -0.577 6