DC vs MI Head to Head: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वात महत्त्वाचा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs Delhi Capitals)  यांच्यात खेळला जाईल. मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) हा सामना रंगणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीला आज मुंबईविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. दिल्लीनं हा सामना जिंकल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचं प्लेऑफमधील तिकीट कापलं जाईल.  
 
मुंबई दिल्ली यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आतापर्यंत एकूण 31 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी दिल्लीनं 15 तर, मुंबईनं 16 सामने जिंकले आहेत. भारतात दोन्ही संघ 23 वेळा एकमेकांच्या विरोधात खेळले आहेत.  त्यापैकी दिल्लीनं 11 तर, मुंबईनं 12 जिंकले आहेत. यूएईमध्ये दिल्ली आणि मुंबई यांच्यात 8 सामने खेळले गेले. ज्यात दोन्ही संघांनी 4-4 सामने जिंकले आहेत. मुंबईविरुद्ध दिल्लीची सरासरी धावसंख्या 146 आहे. तर, दिल्लीविरुद्ध मुंबईची सरासरी धावसंख्या 162 इतकी आहे. दिल्लीकडून ऋषभ पंतनं मुंबईविरुद्ध सर्वाधिक 333 धावा केल्या आहेत. तर, मुंबईकडून रोहित शर्मानं दिल्लीविरुद्ध सर्वाधिक 910 धावा केल्या आहेत.


प्लेऑफचं समीकरण
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात बंगळुरूच्या संघानं 14 सामन्यांपैकी आठ सामने जिंकले आहेत. सध्या बंगळुरूचे 16 गुण आहेत. पण त्यांचा रनरेट (-0.253) खराब आहे. दुसरीकडं दिल्लीच्या संघानं या हंगामात 13 सामने खेळले असून 7 सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्लीसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा नेट रन रेट (+ 0.255) चांगला आहे. अशा परिस्थितीत दिल्लीनं आज मुंबईचा पराभव केल्या केल्यास प्लस नेट रनरेटच्या आधारे प्लेऑफसाठी पात्र ठरेल.


हे देखील वाचा-