IPL Points Table 2022: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर राजस्थान रायल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने आले. या सामन्यात राजस्थानच्या संघानं चेन्नईचा पाच विकेट्सनं पराभव केला. राजस्थानच्या विजयामुळं आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत हालचाल पाहायला मिळाली. चेन्नईला पराभूत करून राजस्थाननं या हंगामातील त्यांचा 9 वा विजय मिळवला. या विजयानंतर राजस्थानचा संघानं गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. तर, लखनौ सुपर जायंट्सची गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात हैदराबादच्या संघान 14 पैकी 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, 20 गुणांसह (+0.316) गुजरातचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. आयपीएल 2022 च्या प्लेऑमध्ये गुजरात, राजस्थान, लखनौ सुपर जायंट्सचं स्थान निश्चित झालं आहे. राजस्थानचे 9 सामने जिंकून 18 गुण (+0.298)  झाले आहेत. त्यानंतर लखनौचा संघ 18 गुणांसह (+0.251) तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या चौथ्या क्रमांकासाठी बंगळुरू आणि दिल्ली यांच्यात स्पर्धा सुरू आहे. बगंळुरूचे 16 गुण आहेत. तर, दिल्लीचे 14 गुण आहेत. दिल्लीला या हंगामातील त्यांचा अखेरचा सामना खेळायचा आहे. या सामन्यात दिल्लीनं विजय मिळवल्यास त्यांचे 16 गुण होतील. जर दोन्ही संघाची तुलना केल्यास दिल्लीचा रनरेट बंगळुरू पेक्षा चांगला आहे. 

आयपीएल 2022 गुणतालिका-

क्रमांक संघ सामने विजय पराभव नेट रन रेट गुण
1 गुजरात टायन्स 14 10 4 0.316 20
2 राजस्थान रॉयल्स 14 9 5 0.298 18
3 लखनौ सुपर जांयट्स 14 9 5 0.251 18
4 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 14 8 6 -0.253 16
5 दिल्ली कॅपिटल्स 13 7 6 0.255 14
6 कोलकाता नाईट रायडर्स 14 6 8 0.146 12
7 पंजाब किंग्ज 13 6 7 -0.043 12
8 सनरायजर्स हैदराबाद 13 6 7 -0.230 12
9 चेन्नई सुपरकिंग्ज 14 4 10 -0.203 8
10 मुंबई इंडियन्स 13 3 10 -0.577 6

 

दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या संघानं पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. त्यानंतर चेन्नईच्या संघानं चार वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि हैदराबादच्या संघान प्रत्येकी दोन-दोन वेळा आयपीएलचं जेतेपद जिंकलं आहे. तर, राजस्थान रॉयल्सनं आयपीएलचा पहिला खिताब जिंकला होता. पहिल्या हंगामातील अंतिम सामन्यात राजस्थाननं चेन्नईचा पराभव केला होता. 

हे देखील वाचा-