IND vs SA T20 Series:  दक्षिण आफ्रिकेचा संघ जून महिन्यात भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये पाहुणा आफ्रिका आणि यजमान भारतीय संघांमध्ये पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. याच मालिकेसाठी आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्याच्या दिवशी म्हणजेच 29 मे रोजी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या मालिकेत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासह कोणकोणत्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यांनी आयपीएल 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत कोणत्या खेळाडूंना संधी मिळून शकते? यावर एक नजर टाकुयात


1) मोहसिन खान
आयपीएलच्या पदापर्णाच्या सामन्यात मोहसिन खाननं लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दमदार कामगिरी करून दाखवली आहे. मोहसिन खाननं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. ज्यात नऊ विकेट्स घेतले आहेत. दिल्लीविरुद्ध सामन्यात त्यानं 16 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या होत्या. 


2)आवेश खान
लखनौ सुपर जायंट्स आणखी एका गोलंदाजाचा या यादीत समावेश आहे. त्यानं यंदाच्या हंगामातही चांगलं प्रदर्शन केलं आहे. यंदाच्या हंगामात त्यान 9 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. आवेश खाननं यावर्षी वेस्टइंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी-20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 


3) उमरान मलिक
जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकनं त्याच्या वेगानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यंदाच्या हंगामात त्यानं सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना 11 सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. या तुफानी गोलंदाजाला दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे. 


4) शिखर धवन
आयपीएल 2022 मध्ये शिखर धवननं आक्रमक फलंदाजी केली आहे. धवननं पंजाब किंग्जसाठी 11 सामन्यांत 42.33 च्या सरासरीनं 381 धावा केल्या आहेत. धवनने मागील वर्षी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय खेळला होता. परंतु त्याचा सध्याचा फॉर्म पाहता तो T20 संघात परत येऊ शकतो.


5) हार्दिक पांड्या
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरातच्या संघाचं नेतृत्व करणारा हार्दिक पांड्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यानं यंदाच्या हंगामात दहा सामने खेळले आहेत. ज्यात 41.62 च्या सरासरीनं 333 धावा केल्या आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी निवडकर्ता त्याची निवड करू शकतात. 


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला येत्या 9 जूनपासून सुरुवात होणार आहे. दिल्लीच्या मैदानावर सलामीचा सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर 12, 14, 17 आणि 19 जूनला अखेरचा टी-20 सामना खेळला जाईल. या मालिकेतील सामने दिल्लीसह कटक, विशाखापट्टनम, राजकोट आणि बंगळुरूत आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. डबलिन येथे 25 जूनला पहिला तर, 28 जूनला दुसरा सामना खेळणार जाणार.


हे देखील वाचा-