Why was Ryan Rickelton Not Out : आयपीएल ही अशी स्पर्धा आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्रिकेटमधील बारीक सारीक नियम कळतात. जेव्हा मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला गेला, तेव्हा आपल्याला एक नवीन नवीन शिकायला मिळाला. हैदराबादचा यष्टीरक्षक हेनरिक क्लासेनने एक चूक केली जी क्रिकेटच्या जगात क्वचितच पाहायला मिळते. सुरुवातीला पंचांनी निर्णय आऊट दिले आणि फलंदाज पॅव्हेलियनमध्येही गेला, पण नंतर कळले की तो नो बॉल होता.
खरंतर, नाणेफेक जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याने सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. अनेक स्टार फलंदाज असलेल्या हैदराबाद संघाला 20 षटकांत फक्त 162 धावा करता आल्या. याचा अर्थ असा की मुंबईला आता हा सामना जिंकण्यासाठी फक्त 163 धावा करायच्या होत्या. मुंबईची सुरुवात संथ होती आणि रोहित शर्माने गियर बदलून वेगवान धावा करण्याचा प्रयत्न करताच तो बाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहित शर्माने 16 चेंडूत 26 धावा केल्या. यामध्ये तीन षटकारांचा समावेश होता. त्याने एकही चौकार मारला नाही. यानंतर घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला.
हेनरिक क्लासेनने केली मोठी चूक
डावाच्या सातव्या षटकात कर्णधार पॅट कमिन्सने झीशान अन्सारीला चेंडू दिला. त्याने मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रायन रिकेलटनलाही आऊट केले. हा त्याच्या षटकातील पाचवा चेंडू होता. पॅट कमिन्सने रायन रिकेलटनला आऊट करण्यासाठी एक शानदार झेल घेतला. पण दरम्यान तिसऱ्या पंचांनी एक मोठी चूक पकडली. चेंडू बॅटला लागण्यापूर्वी यष्टीरक्षक हेनरिक क्लासेनचे ग्लोव्हज स्टंपच्या समोर पोहोचले होते. जे क्रिकेटच्या नियमांनुसार चुकीचे आहे.
यानंतर पॅट कमिन्सने झेल घेतला. ही चूक कोणालाही समजली नाही आणि रायन रिकेलटन परत जाऊ लागला. पण नंतर तिसऱ्या पंचांनी क्लासेनची चूक पकडली आणि तो नो बॉल घोषित करण्यात आला. याचा अर्थ रायन रिकेल्टन अचानक आउटवरून नॉट आउट झाला. पण आठव्या षटकात तो हर्षल पटेलचा शिकार झाला. रायन रिकेलटनने 23 चेंडूत 31 धावा केल्या. त्याने पाच चौकार मारले.
हे ही वाचा -