Rishabh Pant Good Bye To Delhi Capitals : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात ऋषभ पंतला लखनऊ सुपर जायंट्सने विकत घेतले. लखनऊ संघाने पंतला 27 कोटी रुपये देऊन आपल्या संघात घेतले. यापूर्वी पंत दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. पंत हा केवळ दिल्लीचाच भाग नव्हता तर गेल्या मोसमापर्यंत त्याने दिल्लीची कमान सांभाळली होती. आता अचानक दिल्लीपासून वेगळे होणे पंतसाठी पण कठीण आहे आणि त्यामुळे त्याने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पंतने 2016 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. पंत 2024 पर्यंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स या एकाच संघाकडून खेळला. आता आयपीएल 2025 मध्ये तो लखनऊ सुपर जायंट्स या दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सला निरोप देताना पंतने एका पोस्टमध्ये लिहिले की, 'गुडबाय कधीच सोपं नसतं. दिल्ली कॅपिटल्ससोबतचा प्रवास हा खरंच भारी होता. मी इथे युवा खेळाडू म्हणून आलो होतो, पण मागील 9 वर्षांत एक चागंला खेळाडू म्हणून घडलो. दुसरीकडे चाहत्यांनी हा प्रवास आणखी अविस्मरणीय केला. तुम्ही माझ्यासाठी चिअर केलेत, मला प्रोत्साहन दिले. आयुष्याच्या खडतर प्रवासात माझ्यासोबत उभे राहिला त्यासाठी तुमचे खरंच आभार. आता मी दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळणार आहे. तरी तुमचं प्रेम आणि पाठिंबा माझ्या हृदयात कायम राहिल. तुमचे मनोरंजन करण्याचे काम मी पुढेही चालू ठेवेन. सर्वांचे आभार... '
ऋषभ पंतची आयपीएल कारकीर्द
ऋषभ पंतने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 111 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 110 डावांमध्ये त्याने 35.31 च्या सरासरीने आणि 148.93 च्या स्ट्राईक रेटने 3284 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 18 अर्धशतके झळकावली.
हे ही वाचा -
IPL 2025 Auction : मराठमोळ्या Ajinkya Rahaneला मिळणार केकेआर संघाचे कर्णधारपद? सीईओ म्हणाले....