IPL Mega Auction 2022:  आयपीएलच्या पंधराव्या हंगमासाठी पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये बांगलादेशचा उत्कृष्ट ऑलराऊंडर शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) अनसोल्ड ठरला. ज्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होऊ लागले. तसेच शाकीब अल हसनचं अनसोल्ड राहण्यामागे अनेक तर्क वितर्क लावण्यात आले. याचदरम्यान, शाकीबची पत्नी उम्मे अहमद शिशिरनं (Umme Ahmed Shishir) फेसबूकवर एक पोस्ट केलीय. ज्यात तिनं शाकीब अनसोल्ड का ठरला? यामागचं कारण सांगितलंय.


शाकिब हा सध्याच्या क्रिकेट विश्वातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातो. यातच टी-20 क्रिकेटमध्ये त्याची आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. एवढेच नव्हे तर, टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत तो अव्वल क्रमांकावर आहे. मात्र, तरीही आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याही फ्रँचायझीनं त्याच्यावर बोली का लावली नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता त्यामागचे कारण त्याच्या पत्नीनेच उघड केले आहे.


शाकिबच्या पत्नीची फेसबूक पोस्ट-



शाकीबची पत्नीनं केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की, उत्साहित होण्यापूर्वी सांगणं गरजेचं आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी अनेक फ्रँचायझींनी शाकीबसी संपर्क साधला होता. तसेच तो संपूर्ण हंगामात उपलब्ध राहू शकतो का? असं त्याला विचारण्यात आलं. परंतु, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमुळं त्याला शक्य नव्हत. त्यामुळं त्याला कोणत्याही फ्रँचायझींनी विकत घेतलं नाही. जर त्याची कोणत्या संघानं निवड केली असती तर, त्याला श्रीलंका दौऱ्याला मुकावं लागलं असतं. तो आयपीएलमध्ये खेळला असता तर, तुम्ही देशद्रोही ठरवलं असतं, असं तिनं म्हटलंय. तसेच तुमच्या उत्साहावर पाणी फिरवल्याबद्दल माफ करा, अशा शब्दात तिनं ट्रोल करणाऱ्यांना टोमणाही मारला आहे.


आयपीएलच्या मेगा ऑक्शन दोन दिवस चालले. या दोन दिवसांत 10 फ्रँचायझींनी 204 खेळाडूंना खरेदी केलंय. तर, एकूण 5,51,70,00,000 रुपये खर्च केले आहे. यावेळी 67 विदेशी खेळाडूंना दहा संघात खरेदी करण्यात आलंय. तर, 137 भारतीय खेळाडूंवर बोली लावण्यात आली. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha