SRH vs PBKS, IPL 2022 : सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघाचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. दोन्ही संघ यंदाच्या हंगामातील अखेरचा लीग सामना आज खेळणार आहेत. वानखेडेच्या मैदानावर रंगणारा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे. दोन्ही संघाची यंदाच्या हंगामात कामगिरी निराशाजनक झाली आहे. खेळाडूंना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्यामुळे दोन्ही संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. 


हैदराबादचा संघ नियमित कर्णधार केन विल्यमसनशिवाय मैदानात उतरणार आहे. विल्यमसन घरगुती कारणामुळे मायदेशात परतला आहे. त्यामुळे विल्यमसनच्या जागी संघाची धुरा कोण सांभाळणार.. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भुवनेश्वर कुमार आणि निकोलस पूरन या दोन नावाची कर्णधारपदासाठी सर्वाधिक चर्चा सुरु आहे. 


हैदराबाद आणि पंजाब यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील एकूण सामन्याची आकडेवारी पाहिल्यास हैदराबादचा संघाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत १९ सामने झाले आहेत. यामध्ये १३ सामन्यात हैदराबादने तर सहा सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. दोन्ही संघासाठी हा सामना फक्त औपचारिक आहे. पण या सामन्यात विजय मिळवत शेवट गोड करण्याचा प्रयत्न पंजाब आणि हैदराबाद करतील, यात शंका नाही. 


हैदराबाद संघाची धुरा केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार सांभाळण्याची शक्यता आहे. सनराइसर्ज हैदराबादने लागोपाठ पाच पराभवाची मालिका मुंबईविरोधात निसटता विजय मिळवत मोडली होती. पंजाबला आपल्या अखेरच्या सामन्यात दिल्लीकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.  मयांकच्या नेतृत्वात पंजाबची कामगिरी खराब राहिली आहे. यंदाच्या हंगामात पंजाबला लागोपाठ दोन सामने जिंकता आलेले नाहीत. कगिसो रबाडाचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला विकेट घेता आल्या नाहीत. अशात आजचा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या इराद्याने पंजाब उतरेल........ 


आणखी वाचा :


मुंबईच्या विजयानंतर प्लेऑफचं गणित ठरलं, आरसीबी टॉप 4 मध्ये, पाहा वेळापत्रक
IPL 2022 : मुंबईचा दिल्लीला दे धक्का, निर्णायक सामन्यात दिल्लीचा पाच विकेटने पराभव
मुंबईचा विजय होताच विराट कोहलीनं केले ट्वीट, आरसीबीच्या खेळाडूंचं जंगी सेलिब्रेशन
रोहित शर्माची IPLमधील सर्वात खराब कामगिरी यंदा, अर्धशतकही झळकावता आले नाही