Rohit Sharma IPL 2022 Runs : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पाच वेळा आयपीएल चषक जिंकणारा मुंबईचा संघ तळाशी आहे. मुंबईला दहा पराभवाचा सामना करावा लगालाय. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सची ही सर्वात खराब कामगिरी होय.. त्याशिवाय मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचीही आयपीएलच्या करियअरमधील खराब कामगिरी होय.. रोहित शर्माला यंदाच्या आयपीएलमध्ये एकही अर्धशतक झळकावता आले नाही.  2008 पासून आतापर्यंत पहिल्यांदाच असे झालेय की, रोहित शर्माला अर्धशतक झळकावता आलेले नाही. रोहित शर्माची ही आयपीएलमधील सर्वात खराब कामगिरी होय. 

2008 पासून रोहित शर्माची आयपीएलमधील कामगिरी

वर्ष सर्वोच्च धावसंख्या एकूण धावसंख्या
2008   76 404
2009  52    362
2010  73     404
2011 87 372
2012 109* 433
2013 79* 538
2014 59* 390
2015 98* 482
2016 85* 489
2017 67 333
2018 94 286
2019 67 405
2020 80 332
2021 63 381
2022 48 268

यंदाच्या हंगामातील रोहित शर्माची कामगिरी -
आयपीएलचा पंधरावा हंगाम रोहित शर्मासाठी चांगला राहिला नाही. चौदा डावात रोहित शर्माला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. रोहित शर्माने यंदाच्या आयपीएलमध्ये 268 धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहितची सर्वोत्तम खेळी 48 आहे. 

आयपीएलमधील रोहितची कामगिरी -
रोहित शर्माने 227 सामन्याच्या 222 डावांत 5879 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान एक शतक आणि 40 अर्धशतकं झळकावली आहेत. 109* ही सर्वोच्च धावसंख्या आहे. रोहित शर्माने आय़पीएलमध्ये 240 षटकार आणि 519 चौकार लगावले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा आयपीएल चषक उंचावलाय. 

हे देखील वाचा-