Who is the owner of RCB IPL team : आयपीएलच्या रनसंग्रामाला 2008 मध्ये सुरुवात झाली. 17 वर्षांपासून आरसीबी आयपीएलमधील लोकप्रिय संघापैकी एक आहे. आरसीबीचा संघ जितका प्रसिद्ध आहे, तितकेच मालक विजय माल्ल्याही आपल्या ऐसपैस आयुष्यामुळे चर्चेत राहिले. आरसीबीच्या संघात विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, फाफ डु प्लेसिस, राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि युवराज सिंह यांच्यासारखे दिग्गज खेळाडू राहिलेत. या दिग्गजांना सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. विजय माल्ल्यान हजारो कोटी रुपयांचा गंडा घालत फसवणूक केली आहे. तो सध्या विदेशात स्थायिक आहे. पण आरसीबीचा मालक सध्या विजय माल्ल्याच आहे का? असा सवाल चाहत्यांच्या मनात येतोच.  (Who Is the Owner of Rcb)


विजय माल्या आरसीबीचा अजूनही मालक आहे का? Was RCB owned by Vijay Mallya?


2008 मध्ये विजय माल्ल्याने आरसीबी फ्रँचायजी खरेदी केली होती. त्यावेळी विजय मल्ल्या यूनायटेड स्पीरिट्स नावाच्या कंपनीचा चेअरमन होता. विजय माल्ल्या आता यूनायटेड स्पिरिट्स कंपनीचे चेअरमन नाहीत. 


आरसीबी संघाच्या लिलावादरम्यान आरसीबीसाठी 111.6 दशलक्ष डॉलर्सची दुसऱ्या क्रमांकाची बोली होती. विजय माल्ल्या आणि आरसीबीचा प्रवास 2016 पर्यंतचा होता. 2013 पासून विजय माल्ल्या आर्थिक डबगाईला गेला, त्याला घेतलेले कर्जही चुकवता आले नाही. 2016 मध्ये तुरुंगातून वाचण्यासाठी त्याला देश सोडला. सध्या विजया मल्ल्याला भगोडा भारत सरकारने जाहीर केले आहे.  तो वाँटेड गुन्हेगार आहे. आता, किंगफिशर एअरलाइन्स अस्तित्वात नाही आणि RCB चा एकमेव मालक युनायटेड स्पिरिट्स आहे.  


25 फेब्रुवारी 2016 रोजी यूनाइटेड स्पीरिट्स कंपनीकडून स्टेटमेंट जारी करत विजय माल्ल्याचा कोणताही संबंध नसल्याचं जाहीर केले होते. म्हणजेच, आता आरसीबी आणि विजय माल्ल्या यांच्यामध्ये कोणताही संबंध नाही. 


आता आरसीबीची मालकी कुणाकडे ?
 
आरसीबीची मालकी सध्या यूनाइटेड स्पीरिट्स कंपनीकडे आहे. विजय माल्ल्या आणि यूनाइटेड स्पीरिट्स कंपनीचा काही संबंध नाही. म्हणजेच आरसीबी आणि विजय माल्ल्या यांचाही काहीही संबंध नाही. युनायटेड स्पिरिट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे व्यवस्थापन आणि निर्णय घेण्याचे काम पाहणारे एक मंडळ तयार केले आहे.


IPL मध्ये RCB च्या कामगिरीवर नजर


रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुला अद्याप आयपीएल चषक उंचावता आला नाही. पण आरसीबीने अनेकदा फायनल, प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. 17 वर्षांत आरसीबीने आठ वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. 2022 मध्ये आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झाला होता. 2009,2011 आणि 2016 मध्ये आरसीबीने फायनलमध्ये धडक मारली होती. आयपीएल 2023 मध्ये आरसीबी सहाव्या क्रमांकावर होता.