IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या क्वालीफायर सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने येणार आहेत. आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत गुजरातचा संघ सर्वाधिक 10 सामने जिंकून अव्वल स्थानी होता. त्यानंतर राजस्थानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर होता. प्लेऑफ आणि फायनल स्पर्धेतील अतिशय महत्वाचे सामने असतात. या सामन्यात कोणकोणत्या खेळाडूनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. यावर एकर टाकुयात.
आयपीएलच्या इतिहासातील प्लेऑफ आणि फायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. रैनानं 714 धावा केल्या आहेत. या यादीत महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 522 धावा केल्या आहेत. तर, 389 धावांसह शेन वॉटसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मायकल हसी (388) चौथ्या आणि मुरली विजय (364) पाचव्या क्रमांकावर आहे.
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये आणि फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-
फलंदाजांचं नाव | एकूण धावा |
सुरेश रैना | 714 |
महेंद्रसिंह धोनी | 522 |
शेन वॉटसन | 389 |
मायकल हसी | 388 |
मुरली विजय | 364 |
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जोस बटलर अव्वल स्थानी आहे. त्यानं 14 सामन्यात 629 धावा केल्या आहेत. ज्यात तीन शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा या हंगामातील सर्वोत्तम स्कोर 116 धावा आहे. जोस बटलरनंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 14 सामन्यात 537 धावा केल्या आहेत. तर, क्विंटन डी कॉक 502 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-