IPL : क्रिकेटचा महासंग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रिमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा 15 वा हंगाम आहे. पण आतापासून 9 वर्षांपूर्वी याच आयपीएलमध्ये मुंबई क्राईम ब्रांचकडूनन सट्टेबाजी अर्थात बेटिंगची घटना घडली होती. यामध्ये अनेक मोठी नावं समोर आली होती. अनेकांना अटकही करण्यात आली होती. यान्वयेच दोन व्यापारी संजय छाब्रा आणि संदीप छाब्रा यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्या हॉटेल रूममध्ये कथित रुपात बेटिंग सुरु होती, त्याचं बुकिंग या दोघांच्या नावाने असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसंच हे दोघांचा बेटिंग रॅकेटमध्ये सामिल असणाऱ्या काही जणांसोबत संपर्क असल्याचंही मुंबई पोलिसांनी सांगितलं होतं. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय अंपायर अशद राऊफचंही नाव होतं.


दरम्यान या दोघांनाही कनिष्ट न्यायालयाची कोणतीच ऑर्डर आली नसताना यालाच चँलेंज देण्याकरता दोघांनी सेशन कोर्टचा दरवाचा ठोठावला. दरम्यान सेशन कोर्टाने दोघांची सुटका करताना ऑर्डरमध्ये सांगितलं की,'कथित मॅच फिक्सिंगमध्ये दोन्ही आरोपींचं अंपायर राऊफसोबतच्या संभाषणाचं रेकॉर्डिंग योग्य प्रक्रियेनुसार करण्यात आलं नव्हतं, त्यामुळे हे ग्राह्य धरलं जाणार नाही.' तसंच राऊफ आणि छाब्रा यांच्यातील संभाषणाबाबत कोणतेच पुरावे सादर केले गेले नाहीत.


IPL 2022 मध्येही सट्टेबाजी


यंदाच्या हंगामातही काही ठिकाणी सट्टेबाजी होत असल्याची प्रकरणं समोर आली असून महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात हे दिसून आलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एजंटाकरवी चालणारा IPL सट्ट्याचं रॅकेट सोलापूरच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. यामध्ये सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकूण 4 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 38 लाख 44 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.  याशिवाय वर्ध्यांच्या सावंगी मेघे येथील आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या  एका फॉर्म हाऊसवर  स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून सह सट्टेबाजांना अटक केली. आयपीएल सट्टाप्रकरणीच नागपुरातूनही आणखी तिघांना सोलापूर शहर गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केलं.


हे देखील वाचा-