RCB vs PBKS IPL Final 2025 Ahmedabad Weather Update : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 18 व्या हंगामाचा अंतिम सामना 3 जून 2025 रोजी खेळवला जाणार आहे. या हंगामात पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने क्वालिफायर-1 जिंकून थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जने (PBKS) दमदार कामगिरी करत क्वालिफायर-2 मध्ये विजय मिळवून अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. पण आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पाऊस खेळ खराब करू शकतो का आणि या सामन्याचा निकाल कधी येऊ शकतो, चला जाणून घेऊया.
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात हवामान कसं असेल?
चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे, अंतिम सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता फारच कमी आहे. हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार, 3 जून रोजी अहमदाबादमध्ये आकाश स्वच्छ राहणार असून पावसाची शक्यता फक्त 20 टक्के आहे. त्यामुळे सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय खेळवला जाऊ शकतो.
क्वालिफायर-2 मध्ये पाऊस
1 जून रोजी अहमदाबादमधील त्याच मैदानावर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात क्वालिफायर-2 देखील खेळवण्यात आला. या सामन्यात सुमारे दोन तास सतत पाऊस पडला, ज्यामुळे सामना संध्याकाळी 7:30 ऐवजी 9:45 वाजता सुरू झाला. या सामन्यात 2 तासांचा अतिरिक्त वेळ राखीव ठेवण्यात आला होता, ज्यामुळे सामन्यात एकही षटके कमी करण्यात आली नाहीत आणि संपूर्ण 20-20 षटकांचा सामना खेळवण्यात आला. रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत या सामन्याचा निकाल लागला.
जर पाऊस पडला तर अंतिम सामना कोण जिंकेल?
जर आयपीएलच्या अंतिम सामन्यात पाऊस पडला, तर सामना अतिरिक्त दोन तासांसाठी वाढवला जाईल. दुसरीकडे, जर पावसामुळे 3 जून रोजी सामना झाला नाही तर 4 जून हा अंतिम सामन्यासाठी राखीव आहे. असे असूनही, जर 4 जून रोजी सामना झाला नाही, तर पंजाब किंग्जला आयपीएल 2025 चा विजेता घोषित केले जाऊ शकते, कारण लीग सामन्यांमध्ये पीबीकेएस आयपीएल पॉइंट टेबलमध्ये आरसीबीपेक्षा पुढे होता. दोन्ही संघांचे पॉइंट टेबलमध्ये 19-19 गुण आहेत, परंतु पंजाबचा नेट रन रेट बंगळुरूपेक्षा चांगला आहे, त्यामुळे रजत पाटीदारचा बंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे आणि श्रेयस अय्यरचा पंजाब पहिल्या स्थानावर आहे.
हे ही वाचा -