मुंबई : अल्जारी जोसेफ (Alzarri Shaheim Joseph) याच्यासाठी लखनौ (Lucknow) आणि आरसीबी (RCB) संघामध्ये चुरस पाहायला मिळाली. पण यामध्ये आरसीबीने बाजी मारत अल्जारी जोसेफ याला आपल्या संघात सामील करुन घेतले. वेस्ट इंडिजचा खेळाडू असलेल्या अल्जारी जोसेफ याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 11 कोटी 50 लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करुन घेतले. 


अल्झारी शाहिम जोसेफ हा वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. तो वेस्ट इंडिजच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये लीवर्ड आयलंड आणि सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्सकडून खेळतो. तो एक अष्टपैलू खेळाडू आहे जो राईट हँड फास्ट बॉलर आहे. तसेच तो राईट हँड बट्समन देखील आहे. 


अल्जारी जोसेफचं आयपीएल करिअर


2019 च्या आयपीएलमध्ये अल्जारीची निवड ही मुंबईच्या संघासाठी झाली होती. 6 एप्रिल 2019 रोजी, त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि 12 धावांत 6 बळी घेतले,जे आयपीएल पदार्पणातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक ठरले. 2021 च्या आयपीएल लिलावामध्ये तो अनसोल्ड राहिला. 2022 IPL मेगा लिलावात, त्याला गुजरात टायटन्सने 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले. 


मिचेल स्टार्कवर सर्वाधिक बोली


मिचेल स्टार्कसाठी चार संघामध्ये बिडिंग टेबलवर लढत झाली.  मिचेल स्टार्कसाठी दिल्ली आणि मुंबई या दोन संघामध्ये आधी लढत झाली. 10 कोटींपर्यंत बोली पोहचल्यानंतर दिल्लीने माघार घेतली. त्यानंतर कोलकात्याने रस दाखवला. मुंबईने माघार घेतली. पण त्याचवेळी गुजरातनेही रस दाखवला. कोलकाता आणि गुजरात या दोन संघामध्ये स्टार्कसाठी चुरस पाहायला मिळाली. अखेर कोलकात्याने स्टार्कला ताफ्यात घेतले. कोलकात्याने स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये खर्च केले. 


यंदाच्या लिलावात 23 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी


यंदाच्या लिलावासाठी दोन सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. IPL 2024 साठी सर्व 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंची आवश्यकता आहे. याचा अर्थ 333 निवडलेल्या खेळाडूंपैकी केवळ 77 खेळाडूंचा लिलाव होईल. 333 खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे. 


आयपीएलचा लिलाव कुठे?


आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच लिलाव देशाबाहेर पार पडणार आहे. दुबईतील  कोका कोला एरीना येथे लिलावाचं आयोजन करण्यात आलं आहे. 


हेही वाचा : 


Umesh Yadav : उमेश यादवसाठी गुजरात आणि हैदराबादमध्ये झालं जोरदार बिडिंग, अखेर 5 कोटी 80 लाख बोली लावत गुजरातने मारली बाजी