Hardik Pandya, IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सनं आज मुंबईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दिल्लीने निर्धारित 20 षटकांमध्ये 4 विकेटच्या मोबदल्यात 257 धावांचा डोंगर उभरला. दिल्लीच्या फलंदाजांसमोर मुंबईची गोलंदाज पालापाचोळ्यासारखे उडाल्याचं दिसले. विशेषकरुन दिल्लीच्या जेक मॅकगर्क याच्यासमोर मुंबईची गोलंदाजांनी मार कच खाल्ली. मुंबईच्या गोलंदाजांच्या खराब कामगिरीनंतर कर्णधार हार्दिक पांड्याचा पारा चढला. तो मैदानावर गोलंदाजावर चवताळल्याचं दिसलं. हार्दिक पांड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईच्या गोलंदाजांची आणि हार्दिक पांड्याची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.
आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढलं. हार्दिक पांड्याकडे मुंबईच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आले होते. आजच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी कच खालल्यानंतर हार्दिक पांड्या भडकल्याचा दिसला. दहाव्या षटकातील हा प्रकार असल्याचं व्हिडीओतून दिसत आहे. हार्दिक पांड्या गोलंदाजाच्या कामगिरीवर वैतागल्याचं दिसलं.
पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ -
मुंबईची खराब गोलंदाजी, पाहा कुणी किती धावा दिल्या
मुंबईकडून हार्दिक पांड्याची गोलंदाजी सर्वात महागडी ठरली. पांड्यानं 2 षटकात तब्बल 41 धावा खर्च केल्या, त्याला एकही विकेट मिळाली नाही. मोहम्मद नबीने दोन षटकात 20 धावा देत एक विकेट घेतली. गेराल्ड कोइत्जेच्या जागी खेळणाऱ्या ल्यूक वूड यानं खराब गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकांमध्ये 68 धावा खर्च केल्या. त्याला एक विकेट मिळाली. पियुष चावलाने चार षटकात 36 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. जसप्रीत बुमराहाने चार षटकात 35 धावा खर्च करत एक विकेट घेतली. हार्दिक पांड्या महागडा ठरल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल झालाय.
दिल्लीचा 257 धावांचा डोंगर -
जेक मॅकगर्कच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 257 धावांचा डोंगर उभारला आहे. दिल्लीकडून जेक मॅकगर्क यानं 27 चेंडूत 84 धावांची वादळी खेळी केली. त्याशिवाय स्टब्स आणि शाय होप यांनीही झंझावती फलंदाजी केली. स्टब्सने 25 चेंडूमध्ये 48 धावांची खेळी केली. तर शाय होप यानं 17 चेंडूत 41 धावांचा पाऊस पाडला. मुंबईच्या गोलंदाजांनी आज 17 षटकार दिले.