IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सातव्या सामन्यात लखनौच्या संघानं चेन्नईला सहा विकेट्स पराभूत केलं होत. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चेन्नईच्या संघानं लखनौसमोर 211 धावांचं लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य लखौनच्या संघानं तीन चेंडू आणि सहा विकेट्स राखून विजय मिळवलाय. या विजयात लखनौचा फलंदाज आयुष बदोनीनं मोलाचा वाटा उचलला. महत्वाचं म्हणजे, सामन्यादरम्यान बदोनीनं मारलेल्या चेंडू एका महिला प्रेक्षकांच्या डोक्यात जाऊन आदळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


या सामन्यात बदोनीनं फक्त 9 चेंडूच खेळले. या 9 चेंडूत त्यानं दोन षटकाराच्या मदतीनं 19 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या दोन षटकारापैकी एक चेंडू प्रेक्षकांमध्ये बसलेल्या महिलेच्या डोक्यावर जाऊन आदळला आहे. दरम्यान,  19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बदोनीनं उत्तुंग षटकार मारला. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेनं हा चेंडूवर झेल घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हा चेंडू संबंधित महिलेच्या डोक्यावर आदळला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 


व्हिडिओ- 




चेन्नईविरुद्ध सामन्यात बदोनीचा मोलाचा वाटा होता. त्यानं लुईससोबत चांगली फलंदाजी केली. या दोघांमध्ये 40 धावांची भागीदारी झाली. शिवम दुबेच्या 19 षटकांत बडोनी आणि लुईस यांनी मिळून एकूण 25 धावा केल्या. या षटकानंतर लखनौला विजयासाठी फक्त 9 धावांची गरज होती. अखरेच्या षटकात तीन चेंडू आणि सहा विकेट्स राखून लखनौच्या संघानं विजय मिळवला आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha