Evan Lewis : आयपीएल म्हणजे धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीचा खेळ. अनेक रेकॉर्ड्स दररोज तुटत असतात तसंच नवे रेकॉर्ड रचले जात असतात. गुरुवारी देखील झालेल्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील खेळीदरम्यान एविन लुईस याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात फास्ट अर्धशतक ठोकलं. या खेळीच्या जोरावरच लखनौने चेन्नईचं 211 धावाचं आव्हान पूर्ण करत विजयाची नोंद केली. लखनौने चेन्नईचा सहा गड्यांनी पराभव केला.


सामन्यात चेन्नईने दिलेल्या 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौने सुरुवात दमदार केली. कर्णधार के.एल राहुल आणि डिकॉक यांनी 99 धावांची भागिदारी केली. ज्यानंतर सामन्यात दोन्ही सेट फलंदाज गेल्यावर आलेल्या लुईसने विजयासाठी दमदार खेळी करत संघाचा विजय पक्का केला. लुईसने मोक्याच्या क्षणी 23 चेंडूत 53 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि सहा चौकार त्याने लगावले. विशेष म्हणजे यावेळी 23 चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केल्याने हे अर्धशतक यंदाच्या आयपीएलमधील सर्वात जलदगती अर्धशतक ठरलं.



लखनौचा दमदार विजय


कर्णधार के.एल राहुल आणि क्विंटन डिकॉक यांच्या तुफानी सलामीनंतर एविन लुईसच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावर लखनौसंघाने 211 धावांचे आव्हान सहा गाडी राखून सहज पार केले. लखनौने 19.3 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा केल्या. लखनौकडून क्विंटन डिकॉकचे आणि लुईस यांनी अर्धशतकी खेळी केली.  डिकॉकने 61 तर लुईसने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर राहुलने 40 धावांची छोटेखानी खेळी केली. आयपीएलच्या 15 व्या हंगामातील लखनौचा हा पहिला विजय आहे. लखनौला पहिल्या सामन्यात गुजरातकडून पराभव स्विकारावा लागला होता. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे. 


हे देखील वाचा-