Kagiso Rabada Record : पंजाब किंग्ज संघाचा गोलंदाज कागिसो रबाडाने आयपीएल 2022 या हंगामात आपल्या नानावर एक नवीन विक्रम केला आहे. रबाडाने T-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेण्याचा विक्रम नानावर केला आहे. या बाबतीत रबाडाने लसिथ मलिंगा आणि उमर गुलला मागे टाकले आहे. कागिसो रबाडाने  146 सामन्यांमध्ये हा विक्रम केला आहे.


कागिसो रबाडाने काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 54 धावांनी पराभव केला. पंजाबच्या या विजयासह कागिसो रबाडाने आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली आहे. T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट्सच्या बाबतीत रबाडाने लसिथ मलिंगा आणि उमर गुलला मागे टाकले आहे. त्याने 146 सामन्यांमध्ये हे स्थान मिळवले. या विक्रमाच्या बाबतीत रबाडा तिसऱ्या स्थानावर आहे. तर राशिद खान या बाबतीत आघाडीवर आहे. बंगळुरु विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रबाडाने 3 बळी घेतले होत्या.


दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु समोर 210 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात बंगळुरुचा संघ केवळ 155 धावा करु शकला. बंगळुरुच्या फलंदाजीदरम्यान रबाडाने विराट कोहलीची पहिली विकेट घेतली. त्याने 20 धावांवर कोहलीला बाद केले. यानंतर त्याने हर्षल पटेल आणि शाहबाज अहमदला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशा प्रकारे त्याने 4 षटकात 21 धावा देत 3 बळी घेतले. या सामन्यातील कामगिरीच्या जोरावर त्याने टी-20 क्रिकेटमध्ये एक खास विक्रम केला आहे. T-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट्स घेण्याच्या बाबतीत रबाडा तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने मलिंगा आणि गुलसारख्या दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले. गुलने 147 तर मलिंगाने 149 सामन्यांत हे स्थान मिळवले. तर राशिद खान या बाबतीत आघाडीवर आहे. राशिदने 134 सामन्यात 200 विकेट घेतल्या आहेत. या बाबतीत सईद अजमल दुसऱ्या क्रमांकावर आहे. अजमलने 139 सामन्यांमध्ये 200 विकेट घेण्याची कामगिरी केली होती.


महत्त्वाच्या बातम्या: