IPL 2022 Marathi News : आयपीएलमध्ये शनिवारी प्रक्षेकांना डबल डोस होता. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीचा पराभव केला. तर सायंकाळी झालेल्या सामन्यात मुंबईने राजस्थानचा पराभव करत यंदाच्या हंगामातील पहिला विजय संपादन केला. शनिवारी झालेल्या दोन सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झालाय. 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने नऊ सामन्यात आठ सामने जिंकण्याची किमया केली आहे. यासह गुजरातचा संघ 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे.  गुजरातचे अद्याप पाच सामने बाकी आहे. त्याआधीच गुजारातने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केलेय. गुजरात प्लेऑफमध्ये साठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरलाय. या पराभवानंतर आरसीबीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. आरसीबीचा दहाव्या सामन्यातील पाचवा पराभव होता. आरसीबी दहा गुणासह  पाचव्या क्रमांकावर आहे. सांयकाळी झालेल्या सामन्यात मुंबई आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. आठ पराभवानंतर मुंबईने  नवव्या सामन्यात विजय मिळवला. राजस्थानचा हा तिसरा पराभव आहे. राजस्थान संघ नऊ सामन्यात सहा विजय आणि तीन पराभवासह  12 गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

पाहा गुणतालिका

क्रमांक संघ सामने विजय पराभव TIED N/R नेट रनरेट गुण  
1. गुजरात 9 8 1 0 0 +0.377 16  
2. राजस्थान 9 6 3 0 0 +0.450 12  
3. लखनौ 9 6 3 0 0 +0.408 12  
4. हैदराबाद 8 5 3 0 0 +0.600 10  
5. बेंगलोर 10 5 5 0 0 -0.558 10  
6. दिल्ली 8 4 4 0 0 +0.695 8  
7. पंजाब 9 4 5 0 0 -0.470 8  
8. कोलकाता 9 3 6 0 0 -0.006 6  
9. चेन्नई 8 2 6 0 0 -0.538 4  
10. मुंबई 9 1 8 0 0 -0.836 2  


आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जोस बटलरच्या नावावर आहेत. शनिवारी झालेल्या सामन्यात बटलरने पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. बटलरने अर्धशतक झळकावले. यासह जोस बटलर याने नऊ सामन्यात 566 धावा केल्या आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या लखनौच्या राहुलने 374, हार्दिक पांड्या 308, शिखर धवन आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी 307 धावा केल्यात. गोलंदाजीत युजवेंद्र चहल आघाडीवर आहे. चहलने नऊ सामन्यात 19विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कुलदीप यादवने आठ सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. नटराजन आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी 15धावा केल्या आहेत.