Virat Kohli : इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये RCB च्या विजयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या उत्साहाने भरलेले व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. कोणी भावुक होऊन आनंद व्यक्त करत आहे, तर कोणी फटाके फोडत वेडापिसा झाला आहे. या दरम्यान काही असे व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये चाहत्यांचा अतिउत्साह त्यांच्या जीवावर बेतला. अशाच प्रकारचा प्रसंग RCB च्या विक्ट्री परेडदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत पाहायला मिळाला होता. आता सोशल मीडियावर एक असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Continues below advertisement


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये RCB आणि विराट कोहलीचा एक चाहता उत्साहात आपले भान हरपतो. तो आपल्या आनंदाचा इतका अतिरेक व्यक्त करतो आहे की, त्यामुळे त्याचा जीवही धोक्यात येऊ शकतो. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक फॅन स्वतःचे मनगट कापून त्याच्या रक्ताने विराट कोहलीच्या पोस्टरवर टिळा लावत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्स त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.






मनगट कापून रक्ताने लावला टिळा 


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की RCB च्या विजयानंतर एक चाहता आपल्या मनगटावर ब्लेडने वार करत विराट कोहलीच्या पोस्टरवर रक्ताने टिळा लावत आहे. तो ब्लेडने पुन्हा पुन्हा आपलं मनगट कापतो त्यामुळे रक्ताची धार वाहू लागते. एवढं असूनही त्याला याची कल्पनाही नसते की, हा अति वेडेपणा त्याच्या जीवावर बेतू शकतो. व्हिडिओमध्ये तो तरुण तीन वेळा आपले मनगट कापतो आणि कोहलीच्या पोस्टरवर रक्ताने टिळा लावतो.  


टिळा लावल्यानंतर अश्रू अनावर


चाहत्याचा आनंद आणि उत्साह इथेच थांबलेला नव्हता. विराट कोहलीच्या पोस्टरवर रक्ताने टिळा लावल्यानंतर तो चाहता जोरजोराने ओरडू लागतो आणि रडायला लागतो. त्यानंतर तो आपल्या अंगावरील टी-शर्ट काढतो आणि आनंदात दोन्ही हात हवेत उंचावतो. व्हायरल व्हिडिओमध्ये या चाहत्याच्या आनंदाचं आणि वेड्यासारखे प्रेम काय स्वरूप घेते, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.


युजर्सकडून विविध प्रतिक्रिया


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @gharkekalesh या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, "ब्लड जास्त झालं असेल तर हॉस्पिटलमध्ये जाऊन डोनेट करा." दुसऱ्याने लिहिलं, "मी आधीच सांगितलं होतं, काही आरसीबीचे फॅन्स छपरी असतात." एका युजरने लिहिलं, "कोहली साहेब भविष्यात बाबा झाले, तर त्यांचा बिझनेस जोरात चालेल." तर आणखी एकाने लिहिलं, "विराट कोहलीचा एक खरा चाहता."


आणखी वाचा 


IPL 2025 : बुमराह, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, के. एल. राहुलबाबत विजय मल्ल्याचं मोठं विधान; म्हणाला, जर हे चार खेळाडू...