40 RCB Fans Case Registered in Pune : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. अनेक वर्षांपासून जेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या संघाच्या चाहत्यांनी हा आनंद मोठ्या जल्लोषात साजरा केला. मात्र, बंगळुरूच्या स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला असून, या प्रकरणात आरसीबी संघाचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे यांना अटक करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, आरसीबीच्या चाहत्यांच्या वर्तनावर पुण्यातही पोलिसांनी कारवाई केली आहे. एफसी रोड परिसरात आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषात काही रात्री चाहत्यांनी रस्त्यावर हुल्लडबाजी, ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक अडथळा निर्माण केला. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे कारवाई करत 40 हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, आयपीएलमध्ये आरसीबी संघाने विजेतेपद पटकावल्यानंतर पुण्यात क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केला. मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर एकत्र जमले होते. मात्र, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या आवाजात फटाके फोडण्यात आले. रस्त्यावर उभे राहून हुल्लडबाजी करत नागरिकांना आणि वाहनचालकांना अडथळा निर्माण करण्यात आला. यावेळी काही जणांनी असभ्य वर्तन देखील केल्याचे पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांकडून घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हुल्लडबाजी करणाऱ्या 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

Continues below advertisement

जर शहरांमध्ये किंवा इतरत्र ठिकाणी सुद्धा ज्यावेळी असा प्रकारची एखादी गोष्ट घडते, त्यावेळी त्यासाठी विनापरवानगी कोणीही मोठ्या संख्येमध्ये येऊन एखादा कार्यक्रम असेल किंवा आंदोलनाचे एखादी गोष्ट असेल विना परवाना करू शकत नाही.  यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून आदेश दिले जातात. पण विनापरवाना जर अशा प्रकारचा उपद्रव माजवला जात असेल, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार  135 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात होतो. 30 ते 40 जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे. काही जणांवरती यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई पूर्ण झालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही ठिकाणी जाऊन उपद्रव माजवण्याचा प्रकार करू नये, ही लोकांना प्रशासनाकडून विनंतीच नाही तर हे इशारा म्हटला तरी हरकत नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

हे ही वाचा - 

IND Vs ENG Test Series : इंग्लंड दौऱ्यापूर्वी कोच गौतम गंभीरच्या डोक्यात कोणता मास्टर प्लॅन? म्हणाला, '1000 धावा करुनही पराभव होऊ शकतो, जिंकण्यासाठी...'

T20 Mumbai League 2025 : आयपीएल संपली तर सूर्यकुमार यादव नावाचं वादळ घोंगावतंय, 135च्या स्ट्राईक रेटने खेळला, संघाला विजय