IPL 2023, Virat kohli : रन मशीन विराट कोहलीने आज नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये सात हजार धावांचा पल्ला पार केला आहे. सात हजार धावा पूर्ण करणारा विराट पहिलाच खेळाडू आहे. विराट कोहलीने सात हजार धावांचा पल्ला पार केल्यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. किंग कोहलीचे सर्वजण अभिनंदन करत आहेत.



आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. दिल्लीविरोधात  विराट कोहलीने 12 वी धाव घेतल्यानंतर खास रेकॉर्ड नावावर केलाय.  विराट कोहलीने आयपीएलमध्ये सात हजार धावांचा पल्ला पार केलाय. आयपीएलमध्ये सात हजार धावा करणारा विराट कोहली पहिला आणि एकमेव खेळाडू झालाय.  दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्याच नावावर आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये ४९ अर्धशतके आणि पाच शतके झळकावली आहेत.  


आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू


विराट कोहली - 7000* (233 M) 
शिखर धवन - 6536 (213 M) 
डेविड वॉर्नर - 6189 (172 M) 
रोहित शर्मा - 6063 (237 M)
सुरेश रैना - 5528 (205 M)


यंदा विराट कोहली भन्नाट फॉर्मात -


पुन्हा एकदा किंग कोहलीची बॅट चालू लागली आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. यंदच्या हंगामात विराट कोहली जरदबस्त फॉर्मात आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फंलदाजात विराट कोहली आघाडीच्या खेळाडूमध्ये आहे. आतापर्यंत विराट कोहलीने नऊ सामन्यात डावात ३८३ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ८२ इतकी आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये विराट कोहलीने ४९ अर्धशतके आणि पाच शतके झळकाली आहेत.  यंदाच्या हंगामात विराट कोहलीने 33 चौकार आणि  11 षटकारासह पाच अर्धशतके झळकावली आहेत.