Most ducks in IPL history : मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज झालाय. चेन्नईच्या दीपक चाहर याने रोहित शर्माला आज शून्यावर बाद केले. आयपीएलमध्ये शून्यावर बाद होण्याची रोहित शर्माची ही सोळावी वेळ होती. रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर टीकास्त्र सोडले जातेय.
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएल 2023 मध्ये रोहित शर्माला चांगली कामगिरी करता आलेली नाही. अनेक वेळा रोहित शुन्यावर बाद झाला आहे. यासोबतच रोहितने आयपीएलमध्ये नकोसा विक्रम केला आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे. त्याशिवाय रोहित शर्माने गौतम गंभीरचा एक नकोसा विक्रमह मोडीत काढला आहे कर्णधार असताना सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर झाला आहे. याआधी हा विक्रम गौतम गंभीरच्या नावावर होता. गौतम गंभीर आयपीएलमध्ये कर्णधार असताना १० वेळा शून्यावर बाद झालाय. ही रोहित शर्मा कर्णधार असताना ११ व्यांदा शून्यावर बाद झालाय.
'या' यादीत इतर खेळाडूंचाही समावेश
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात दिनेश कार्तिक, मंदीप शर्मा, सुनील नारायण हे खेळाडू शून्यावर प्रत्येकी 15-15 वेळा बाद झाले आहेत. यामध्ये आता रोहित शर्माचं नाव पहिल्या स्थानावर आहे. रोहित शर्मा तब्बल १६ वेळा शून्यावर बाद झालाय. याशिवाय अंबाती रायडूही आयपीएलमध्ये 14 वेळा शून्यावर बाद झाला आहे.