Virat Kohli Daughter : विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आयपीएल 2024 एलिमिनेटर सामन्यात पराभूत  झाली. प्लेऑफमध्ये आरसीबीचे आव्हान संपुष्टात आलेय. विराट कोहली आता विश्वचषकात खेळताना दिसणार आहे. दोन जून पासून वेस्ट इंडिज  आणि अमेरिकामध्ये वर्ल्डकपचा थरार रंगणार आहे. विराट कोहली नेहमीच चर्चेत असतो. विराट कोहलीचा जगभरात बोलबाला आहे. विराट कोहलीची मुलगी वामिकाही सोशल मीडियावर चर्चेत असते. कोहलीच्या मुलगी वामिका या नावाचीही सोशल मीडियावर चर्चा असते. विराट कोहलीची मुलगी वामिका हे नाव इंटरनेटवर आठ कोटींपेक्षा जास्त रुपयांना विकलं जातेय. वाचून धक्का बसला नाही, पण हे खरेय. 


आठ कोटींचं नाव - 


विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका हिचा जन्म 11 जानेवारी 2021 रोजी झाला होता. वामिका नावाचा अर्थ देवी दुर्गाचे एक रुप मानले जातेय. वामिका हे नाव आठ कोटींना विकले जातेय. कुठं ते पाहूयात..  GoDaddy ही एक वेब होस्टिंग कंपनी आहे, यावर कोणताही व्यक्ती आपल्या बजेटनुसार डोमेन खरेदी करतो. यामध्ये वामिका कोहली हे नाव खरेदी करण्यासाठी पाहिल्यास आलेली किमत पाहिल्यास धक्का बसेल. वामिका कोहली नावाचं डोमेन GoDaddy वर 8.3 कोटी रुपयांना विकले जातेय. म्हणजेच, म्हणजेच एखाद्या व्यक्तीला वामिका कोहलीच्या नावाने डोमेन घ्यायचे असेल तर त्याला 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. ही रक्कम यूएस चलनात 1 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे.


विराट कोहली आरसीबीसाठी वन मॅन आर्मी


आयपीएल 2024 मध्ये आरसीबीचं आव्हान प्लेऑफमध्येच संपुष्टात आलेय. आरसीबीचं 17 व्या वर्षीही आयपीएल चषक विजयाचं स्वप्न भंगलं. आरसीबीने साखळी फेरीतील अखेरच्या सहा सामन्यात विजय मिळवत प्लेऑफचं तिकिट पक्के केले होते. पण एलिमिनेटर सामन्यात आरसीबीला राजस्थानकडून चार विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या हंगामात विराट कोहलीने खोऱ्याने धावा जमवल्या आहेत. आरसीबीच नाही तर आयपीएलमधील सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराट कोहलीने 15 सामन्यात 62 च्या सरासरीने 741 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये पाच अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. विराट कोहलीने 38 षटकार ठोकण्याचा पराक्रमही केलाय.