Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Qualifier 2 : राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज क्वालिफायर 2 सामना होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर  दोन्ही संघ आमनेसामने असतील. विजेता संघ फायनलमध्ये धडक मारणार आहे, तर पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये हैदराबादचा पराभव झाला होता, तर एलिमेनटर सामन्यात राजस्थानने आरसीबीचा पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. हैदरबाद आणि राजस्थान यांच्यातील विजेता संघ 26 मे रोजी कोलकात्याशी भिडणार आहे. यंदाच्या हंगामात राजस्थान आणि हैदराबाद यांच्यामध्ये फक्त एकवेळा सामना झालाय. ज्यामध्ये हैदराबादने विजय मिळवलाय. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 201 धावांचा पाऊस पाडला होता. धावांचा पाठलाग करताना राजस्थानने 200 धावांपर्यत मजल मारली होती. हैदराबादने फक्त एका धावेनं सामना जिंकला होता. आता हिशोब चुकता करण्यासाठी राजस्थानचा संघ मैदानात उतरलाय. 


राजस्थान- हैदराबाद वरचढ कोण ? पाहा हेड टू हेड आकडे  


सनरायइजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये काटें की टक्कर झाली आहे. आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ आतापर्यंत 19 वेळा भिडले आहेत. सर्व सामने रंगतदार झाले आहेत. सनरायजर्स हैदरादाबने 10 वेळा विजय मिळवलाय, तर राजस्थानला नऊ सामन्यात विजय मिळाला आहे. 


एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी कशी असेल, रिपोर्ट काय सांगते ?


हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील दुसरा क्वालिफायर सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी आहे, या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊसही पडतो. चेन्नईच्या मैदानावर आतापर्यंत सर्वाधिक 200 धावांचा स्कोर झालाय.  सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स दोन्ही संघाचे फलंदाज फॉर्मात आहेत. दुसऱ्या क्वालिफायर-2 सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, 24 मे रोजी चेन्नईमध्ये पावसाची कोणताही शक्यता नाही. दव पडू शकतं, असा अंदाज वर्तवला जातोय, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करु शकतो. त्यामुळे नाणेफेक महत्वाची ठरणार आहे. 


राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेईंग 11  -


टॉम कोहलर-केडमोर, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि  युजवेंद्र चहल. 


इम्पॅक्ट प्लेयर : शिमरन हेटमायर/नंद्रे बर्गर.


सनरायजर्स हैदराबादची संभाव्य प्लेईंग 11 - 


ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश कुमार रेड्डी, शाहबाज अहमद, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, पॅट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन 


इम्पॅक्ट प्लेयर : वाशिंगटन सुंदर