IPL 2024 Eliminator RR vs RCB अहमदाबाद : आयपीएल 2024 च्या प्लेऑफच्या लढतीत एलिमिनेटरच्या लढतीत राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने येणार आहेत. आजच्या मॅचमध्ये ज्या संघाचा विजय होईल तो संघ 24 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध क्वालिफायरची मॅच खेळणार आहे. आरसीबीनं सुरुवातीच्या निराशाजनक कामगिरीनंतर धडाकेबाज प्रदर्शन केलं आहे. सलग सहा सामने जिंकून आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचलीय. आज प्लेऑफमध्ये बंगळुरु आणि राजस्थान आमे सामने येण्यापूर्वीचं आरसीबीचा माजी संघमालक विजय मल्ल्यानं विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
विजय मल्ल्या काय म्हणाला?
विजय मल्ल्यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन आरसीबीला सदिच्छा दिल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची एलिमिनेटरमधील लढथ आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे . या लढतीपूर्वीच विजय मल्ल्यानं एक ट्विट केलं आहे. आरसीबी या वर्षी चॅम्पियन म्हणजेज विजेतेपद मिळवू शकते असं म्हटलं.
"जेव्हा मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रँचायजी आणि विराट कोहलीला खरेदी केलं होतं तेव्हा माझ्या अंतरआत्म्यानं मला सांगितलं होतं की या पेक्षा चांगला निर्णय मी घेऊ शकत नव्हतो . तो अंतरआत्मा आता मला सांगतोय की आयपीएल विजेतेपदासाठी आरसीबी इतका दुसरा प्रबळ दावेदार कोणी नाही, असं मल्ल्या म्हणाला.
आरसीबीनं आयपीएलच्या 17 व्या हंगामामध्ये दमदार पुनरागमन केलं आहे. सलग सहा सामन्यांमध्ये विजय मिळवत आरसीबीची टीम प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. 3 मे पर्यंत बंगळुरु गुणतालिकेत दहाव्या स्थानावर होतं. त्यानंतर त्यांनी सलग सहा मॅच जिंकल्या आणि प्लेऑफमध्ये प्रवेश केला. आयपीएल 2024 पूर्वीपर्यंत आरसीबीनं नऊ वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. तर, तीन वेळा अंतिम फेरीच्या लढतीत प्रवेश मिळवला मात्र त्यांना विजेतेपद मिळवता आलेलं नाही.
आयपीलमध्ये विराट कोहलीनं यंदा14 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 155.60 च्या स्ट्राइक रेटनं 708 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं यावर्षी एक शतक आणि पाच अर्धशतकं लगावली आहेत. विराटनं यावर्षी 59 चौकार मारले तर 37 षटकार मारले आहेत.
कोहलीच्या नावावर एका आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. विराटनं 2016 च्या आयपीएलमध्ये 16 मॅचमध्ये 973 धावा केल्या होत्या. त्यामध्ये चार अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश होता.
संबंधित बातम्या :
हरभजन सिंहने हार्दिक पांड्याची केली पाठराखण, म्हणाला, त्याची काहीच चूक नाही; रोहितला धरले जबाबदार