Vijay Mallya Reaction On RCB vs CSK : आयपीएल 2024 प्लेऑफमध्ये पोहचणारा आरसीबी चौथा संघ ठरला. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीने मोक्याच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा 27 धावांनी पराभव केला. आरसीबीच्या विजयानंतर सोशल मीडियावर आरसीबीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कठीण परिस्थितीमध्ये आरसीबीने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलेय. तीन आठवड्यापूर्वी आरसीबीला स्पर्धेतून बाहेर गेले, असेच सर्वजण म्हणत होते. पण आरसीबीने करिश्मा करत प्लेऑफमधील स्थान निश्चित केलेय. आरसीबीच्या विजयानंतर जुना मालक विजय माल्ल्या याने ट्वीट करत अभिनंदन केलेय. पण विजय माल्ल्याला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केलेय. माल्ल्याच्या ट्विटची खिल्ली उडवली जातेय.
आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतर विजय माल्ल्याने केले अभिनंदन -
विजय माल्ल्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, "प्लेऑफमध्ये पोहोचल्याबद्दल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे हार्दिक अभिनंदन, आता हा संघ टॉप-4 संघांमध्ये पोहोचला आहे. या मोसमाची सुरुवात खराब झाली होती. पण त्यानंतर खेळाडूंनी अप्रतिम उत्साह दाखवत विजयी घोडदौड साधली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ट्रॉफीकडे वाटचाल केली आहे." विजय माल्ल्याच्या पोस्टवर चाहत्यांनी खिल्ली उडवली. नोटकऱ्यांनी विजय माल्ल्याला जोरदार ट्रोल केलेय. विजय माल्ल्याचे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी विजय माल्ल्याला चांगलेच झापले आहे.
चेन्नईचा पराभव, आरसीबीची प्लेऑफमध्ये धडक -
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 218 धावांचा डोंगर उभारला. आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस यानं अर्धशतक ठोकले. विराट कोहली 47, रजत पाटीदार 41, कॅमरुन ग्रीन 38 यांनी महत्वाच्या खेळी केल्या. त्याशिवाय दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अखेरच्या क्षणी चौकार आणि षटकारांचा पाऊश पाडला. मॅक्सवेलने 16 तर कार्तिकने 14 धावा वसूल केल्या. 2019 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. कर्णधार ऋतुराज स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर मिशेलही 4 धावांवर बाद झाला. रचीन रवींद्र याने एकट्याने लढा दिला. त्याने 61 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला ठरवीक अंतराने विकेट पडल्या. शिवम दुबे, सँटनर बाद झाले. अखेरीस जाडेजा आणि धोनीने फटकेबाजी केली, पण विजय मिळवून देऊ शकले नाहीत. आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला.