DC vs MI IPL 2025 Match Video Viral : आयपीएल 2025 च्या 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना खूपच रोमांचक होता, जिथे चाहत्यांना भरपूर चौकार आणि षटकार पाहायला मिळाले. पण, सामन्यादरम्यान स्टँडमधील चाहत्यांमध्ये गोंधळही दिसून आला. जिथे चाहते एकमेकांशी भिडले आणि एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्ली-मुंबई सामन्यात जोरदार राडा
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या व्हिडिओमध्ये चाहत्यांमध्ये बराच गोंधळ दिसून आला. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, सामन्यादरम्यान काही चाहते एकमेकांशी भिडले आणि एकमेकांना जोरदार मारहाण करू लागले. या घटनेत एक महिलाही सामील होती, जी या भांडणात पुढे होती. या महिला चाहत्याने त्या पुरुषाला लाथा-बुक्क्या आणि जोरदार कानाखाली मारली. मात्र, या भांडणामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. हाणामारी थांबवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही हस्तक्षेप करावा लागला. हा व्हिडिओ आता खूप व्हायरल होत आहे.
चेन्नई आणि पंजाब सामन्यात चाहत्यांमध्ये राडा
यापूर्वी, 8 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारीही झाली होती. खरंतर, पंजाब किंग्जची सह-मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने चाहत्यांची मने जिंकण्यासाठी त्यांच्या दिशेने टी-शर्ट फेकले, ज्यामुळे चाहते एकमेकांशी भिडले.
मुंबई इंडियन्सचा रोमांचक विजय
हा सामना मुंबई इंडियन्ससाठी खूप खास होता. त्याने सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 205 धावा केल्या. ज्याला प्रत्युत्तर देताना दिल्लीचा संघ 19 षटकांत 193 धावा करून ऑलआऊट झाला. एकेकाळी दिल्लीने फक्त 2 विकेट गमावून 135 धावा केल्या होत्या. पण यानंतर मुंबईने जोरदार पुनरागमन केले आणि हंगामातील दुसरा विजय मिळवला.
हे ही वाचा -