Tim David Plays Prank On Virat Kohli : जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात विराट कोहली नावाचे वादळ आले होते. तो राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी एक हिरो ठरला. मात्र, सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ड्रेसिंग रूममध्ये विराटसोबत असे काही घडले, ज्यामुळे त्याला धक्का बसला. खरंतर, सामन्यानंतर, त्याचा किट पॅक करत असताना, कोहलीला जाणवले की त्याची एक बॅट गायब आहे. आरसीबी संघाने या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये विराटची बॅट गायब
खरंतर, विराट कोहली जयपूरला बॅट घेऊन आला होता. पण सामन्यानंतर त्याचे किट पॅक करताना त्याच्याकडे फक्त 6 बॅट होत्या. पण, त्याची बॅट चोरीला गेली नाही. पण, विराटचा सहकारी टिम डेव्हिडने त्याच्यावर एक प्रँक केला. टिम डेव्हिडने आधीच विराटची एक बॅट त्याच्या किटबॅगमधून बाहेर लपवून ठेवली होती. आरसीबीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोहली म्हणतो की, त्याची सातवी बॅट कुठेच दिसत नाही. नंतर विराट कोहलीला कळते की, त्याची बॅट टिम डेव्हिडच्या बॅगेत आहे.
त्यावेळी कोहली त्याच्या सहकाऱ्यांना विनोदाने शिवीगाळ करतो आणि म्हणतो की तुम्हाला सर्वांना हे माहित होते आणि तो टिम डेव्हिडच्या बॅगमधून त्याची बॅट घेतो. या प्रँकनंतर टिम डेव्हिड म्हणाला, 'विराट खूप चांगली फलंदाजी करत होता. म्हणून आम्ही विचार केला की त्याचे एक बॅट चोरू. आणि हे त्याला कळायला किती वेळ लागतो ते पाहूया.
कोहलीची 'विराट' खेळी
हा सामना विराटसाठी खूप संस्मरणीय होता. त्याने नाबाद 62 धावा करत आरसीबीला 9 विकेट्सने विजय मिळवून दिला. हे त्याचे टी-20 मधील 100 वे अर्धशतक होते. हा टप्पा गाठणारा तो जगातील दुसरा आणि भारतातील पहिला खेळाडू ठरला. याशिवाय, त्याच्याकडे आता आयपीएल 2025 मध्ये 248 धावा आहेत आणि तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आला आहे.
हे ही वाचा -