IPL 2022 Marathi News : आयपीएलच्या 15 व्या हंगामात प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेलेल्या मुंबई इंडियन्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज टायमल मिल्स दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकणार आहे. मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्स याला उर्वरित सामन्यासाठी करारबद्ध केले आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 


टायमल मिल्सने मुंबईकडून खेळताना पाच सामन्यात सहा विकेट घेतल्या होत्या. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. मुंबईला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. मुंबईच्या संघाला आठ पराभवाचा सामना करावा लागलाय. मुंबईला नऊ सामन्यात फक्त एक विजय मिळवता आलाय. मुंबईचा संघ गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आलेय. त्यातच टायमल मिल्स दुखापतीमुळे आयपीलमधून बाहेर गेलाय. 


मुंबई इंडियन्सने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलेय की, टायमल मिल्स दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलमधून बाहेर गेलाय. त्याच्याजागी दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज  ट्रिस्टन स्टब्स याला करारबद्ध करण्यात आले आहे. 21 वर्षीय ट्रिस्टन स्टब्स याने नुकताच दक्षिण आफ्रिका ए संघात पदार्पण केले आहे. तो मध्यक्रम विस्फोटक फलंदाजी करतो. 






स्टब्सने 17 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये 157.14 च्या स्ट्राईक रेटने 506 धावा चोपल्या आहेत. 20 लाख रुपयांच्या किंमतीमध्ये मुंबईने स्टब्सला खरेदी केले आहे.  मिल्सला मुंबईने 1.50 कोटी रुपयात खरेदी केले होते.  


हे देखील वाचा-