Jofra Archer News : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचं यंदा खराब कामगिरीमुळे आयपीएल 2022 मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यांनी यंदा महालिलावात(IPL auction 2022) खास संघ तयार केला नसल्याची टीका अनेकजण करत आहेत. दरम्यान 8 कोटी रुपये खर्च करत मुंबईने इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra archer) याला संघात घेतलं होतं. पण जोफ्रा दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकला नाही. पण आता तो दुखापतीतून सावरत असून लवकरच मैदानावर पुनरागमन करणार आहे. त्यामुळे यंदा नाहीतरी पुढील हंगामात नक्कीच तो मुंबईकडून मैदानात उतरु शकतो.


नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार 26 मे रोजी टी-20 ब्लास्ट (T20 Blast) स्पर्धेत ससेक्स संघाकडून (sussex county cricket club) जोफ्रा मैदानात उतरु शकतो. त्यामुळे आयपीएलच्या पुढील हंगामात जोफ्रा मुंबई इंडियन्सकडूनही मैदानात परत येण्याची दाट शक्यता आहे. यंदा तरी मुंबईने सलग 8 सामने गमावल्यानंतर नववा सामना राजस्थान विरुद्ध जिंकला. पण तोवर इतर संघ मुंबईच्या पुढे निघून गेल्याने मुंबईचं आव्हान यंदासाठी संपलं आहे.


जोफ्रा आर्चरने अखेरचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना मार्चमध्ये भारताविरुद्ध खेळला होता. पण त्यानंतर दुखापतीमुळे तो अजूनपर्यंत मैदानावर परतू शकलेला नाही. आर्चरच्या एल्बोला दुखापत झाल्यामुळे तो विश्रांतीवर होता. दरम्यान दिर्घकाळ झालेल्या या दुखापतीमुळे त्याच्याकडून इंग्लंड संघाचं कॉन्ट्रॅक्टही घेतलं जाईल, अशी शक्यता होती. पण आता तो दुखापतीतून सावरला असून लवकरच मैदानावर उतरणार आहे.


हे देखील वाचा-