MI vs DC Toss Report: मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात येणाऱ्या आयपीएल 2022 च्या 68 व्या सामन्यात मुंबईच्या संघानं नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. आजचा सामना दिल्लीच्या संघासाठी महत्वाचा आहे. आजच्या सामन्यात मुंबईला पराभूत करण्यासाठी आणि प्लेऑफचं तिकिट निश्चित करण्यासाठी दिल्लीचा संघ मैदानात उतरणार आहे. मुंबईच्या संघासाठी आजचा सामना औपचारिक असला तरी अखेरच्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा रोहित सेनेचा प्रयत्न असेल.


मुंबई-दिल्ली सामन्यात तीन महत्वाचे बदल
मुंबईविरुद्ध दिल्ली सामन्यात एकून तीन बदल पाहायला मिळत आहे. मुंबईनं स्टब्स आणि संजय यांच्या ऐवडी डेवाल्ड ब्रेविस आणि शॉकीनला संधी दिली आहे. तर, दिल्लीच्या संघात पृथ्वी शॉचं पुनरागमन झालं आहे. दिल्लीनं ललित यादवला बाहेर बसवलं आहे. 


मुंबई- दिल्ली यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आतापर्यंत एकूण 31 वेळा आमने सामने आले आहेत. त्यापैकी दिल्लीनं 15 तर, मुंबईनं 16 सामने जिंकले आहेत. भारतात दोन्ही संघ 23 वेळा एकमेकांच्या विरोधात खेळले आहेत.  त्यापैकी दिल्लीनं 11 तर, मुंबईनं 12 जिंकले आहेत. यूएईमध्ये दिल्ली आणि मुंबई यांच्यात 8 सामने खेळले गेले. ज्यात दोन्ही संघांनी 4-4 सामने जिंकले आहेत. मुंबईविरुद्ध दिल्लीची सरासरी धावसंख्या 146 आहे. तर, दिल्लीविरुद्ध मुंबईची सरासरी धावसंख्या 162 इतकी आहे. दिल्लीकडून ऋषभ पंतनं मुंबईविरुद्ध सर्वाधिक 333 धावा केल्या आहेत. तर, मुंबईकडून रोहित शर्मानं दिल्लीविरुद्ध सर्वाधिक 910 धावा केल्या आहेत.


दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन:
पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), सरफराज खान, रोव्हमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद.


मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: 
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), डेवाल्ड ब्रेविस, तिळक वर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंह, डॅनियल सॅम्स, हृतिक शॉकीन, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, मयंक मार्कंडे.