IPL 2022 Update : आयपीएलच्या 15 व्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. 26 मार्च पासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार आहे. राजस्थान रॉयल्स (RR) संघाने इंडियन प्रीमिअर लीग (IPL) च्या यंदाच्या हंगमासाठी श्रीलंका संघाचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. राज्यस्थान रॉयल्सने ट्विट करत याची माहिती दिली. लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्स संघाचा सहभाग राहिला आहे. मुंबईच्या गोलंदाजीची धुरा मलिंगाने अनेक वर्ष वाहिली आहे.  


38 वर्षीय मलिंगाने नुकतेच श्रीलंका संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. राज्यस्थान रॉयल्स संघाने शुक्रवारी ट्विट करत लसिथ मलिंगाला नियुक्त केल्याची घोषणा केली. 2008 च्या आयपीएल विजेत्या राज्यस्थान रॉयल्स संघाची गेल्या काही वर्षातील कामगिरीत खराब राहिली आहे. त्यांना 2008 नंतर एकदाही अंतिम फेरीत पोहचला आले नाही. काही हंगामामध्ये तर राज्यस्थान संघ सातव्या आणि आठव्या क्रमांकावर राहिला आहे. 2021 मधील आयपीएलमध्ये राज्यस्थान संघाला फक्त पाच विजय मिळवता आले होते. तर 9 पराभवाचा सामना करावा लागला होता. राज्यस्थान रॉयल्स संघाने ट्विट करत लसिथ मलिंगाचे आपल्या खास अंदाजात स्वगात केले आहे.  


वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने 2019 मध्ये अखेरचा आयपीएल सामना खेळला होता. त्यावेळी चेन्नईविरोधात खेळताना मुंबईच्या विजयात मलिंगाने महत्वाची भूमिका बजावली होती. आयपीएलमध्ये मलिंगा पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सवगळता इतर संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसणार आहे. 






राजस्थान रॉयल्सचा संघ -
शिलेदार – संजू सॅमसन (१४ कोटी), जोस बटलर (१० कोटी) यशस्वी जैस्वाल (४ कोटी), रवीचंद्रन आश्विन (५ कोटी), ट्रेण्ट बोल्ट (८ कोटी), शिमरॉन हेटमायर (८.५० कोटी), देवदत्त पडिक्कल (७.७५ कोटी), प्रसिध कृष्णा (१० कोटी), युजवेंद्र चहल (६.५० कोटी), पराग रियान (३.८ कोटी), केसी करिअप्पा (३० लाख), नवदीप सैनी (२.६० कोटी), महिपाल लोमरोर (९५ लाख), ओबेद मेकॉय (७५ लाख), चामा मिलिंद (२५ लाख), अनुनयसिंग (२० लाख)