IPL 2023 Auction : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयीएलचा आगामी 16वा सीझन (IPL 2023) हळूहळू जवळ येत आहे. यासाठी नुकताच एक मिनी ऑक्शनही (IPL 2023 Auction) पार पडला. ज्यामध्ये अनेक खेळाडूंना वेगवेगळ्या फ्रँचायझींनी खरेदी केले आहे. यामध्ये मुंबईने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला (Cameron Green) आपल्या संघाचा भाग बनवलं. तब्बल 17.50 कोटी रुपये मुंबईने खर्च केले दरम्यान या मिनी लिलावानंतर माजी भारतीय खेळाडू आकाश चोप्राने मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन कशी असेल याबाबत अंदाज वर्तवला आहे. मुंबईच्या संघात कोणत्या चार परदेशी खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनचा भाग होता येईल, याबाबतही आकाशने आपलं मत सांगितलं.


आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनेलवर याबद्दल बोलताना म्हणाला, “जर तुम्ही बीबीएल लीग (BBL League) पाहत असाल तर रिचर्डसन एक दमदार खेळाडू आहे, याचा तुम्हाला अंदाज येईल. त्यात संघात विदेशी वेगवान गोलंदाजांना खेळवणं फायदाचं आहे कारण भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये ती गुणवत्ता नाही. त्यामुळे रिचर्डसन किंवा जेसन बेहरेनडॉर्फ यांच्यासोबत जोफ्रा आर्चर आणि नंतर कॅमेरुन ग्रीनसह टिम डेव्हिड यांना अंतिम 11 मध्ये स्थान मिळू शकतं. ट्रिस्टन स्टब्स आणि डेवाल्ड ब्रेविस यांना सध्या बेंचवर बसवलं जाऊ शकत." कॅमेरून ग्रीन सध्या आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. दुसऱ्या कसोटीत गोलंदाजी करताना त्याने 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. मात्र, यानंतर फलंदाजीदरम्यान त्याला दुखापतही झाली. दुसरीकडे, रिचर्डसन सध्या खेळल्या जात असलेल्या बिग बॅश लीगमध्ये शानदार गोलंदाजी करताना दिसत आहे. तो पर्थ स्कॉचर्सकडून खेळत आहे.


हा लिलाव का आवश्यक होता?


आकाश चोप्राने संपूर्ण मुंबई इंडियन्स टीमबाबत आपलं मत देताना तो म्हणाला, “मुंबईसाठी हा लिलाव खूप महत्त्वाचा होता कारण गेल्या वर्षी त्यांचा फॉर्म जसा होता तसा कधी नव्हता. ते पॉईंट टेबलमध्ये वर असतात पण 2022 मध्ये ते तळाशी होते. त्यामुळे हा लिलाव त्यांच्यासाठी महत्त्वाचा होते. आता आगामी आयपीएलमध्ये जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह उपस्थित राहणार असल्याने संघ सध्या चांगला दिसून येत आहे.”


हे देखील वाचा-