ICC Men’s Emerging Cricketer 2022 : आता 2022 वर्ष संपत आलं असून वर्ष संपण्यास काही दिवस शिल्लक आहे, या संपूर्ण वर्षाचा विचार केला तर क्रीडा जगतासाठी (Sports) खासकरुन क्रिकेटसाठी हे वर्ष फार खास होतं. टी20 विश्वचषक, आशिया कप विविध मालिका, लीग अशा अनेक स्पर्धा पार पडल्या. या विविध क्रिकट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंपैकी एकाला 'मेन्स इमर्जिंग क्रिकेटर 2022' (ICC Men’s Emerging Cricketer of the Year 2022) हा पुरस्कार मिळणार आहे. ज्यासाठी चार नामांकनं आयसीसीने जाहीर केली आहेत. यामध्ये दोन डावखुऱ्या गोलंदाजांसह दोन सलामीवीरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) याचंही यामध्ये नाव आहे. तसंच दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मार्को यान्सन (Marco Jansen), अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहीम जद्रान (Ibhrahim Zadran) आणि न्यूझीलंडचा सलामीवीर फिन अॅलन (Finn Allen) यांनाही नॉमिनेट करण्यात आलं आहे.






या महत्त्वाच्या पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर नजर फिरवल्यास दक्षिण आफ्रिकेच्या मार्कोने कसोटी क्रिकेटमध्ये कमाल कामगिरी केली आहे. त्याने या वर्षात 36 कसोटी विकेट्स घेतल्या असून 229 धावाही केल्या आहेत. तसंच दोन एकदिवसीय सामन्यातील विकेट्स आणि एक टी20 विकेटही त्याने घेतली आहे. त्यानंतर अफगाणिस्तानच्या इब्राहीमचा विचार केल्यास त्याने वन डे सामन्यात 88.31 च्या स्ट्राईक रेटने 431 रन केले आहेत. तर टी20 मध्ये च्या 109.55 च्या तगड्या स्ट्राईक रेटने 367 रन केले आहेत. याशिवाय न्यूझीलंडचा सलामीवीर फिन अॅलन यानेही वन-डे आणि टी20 दोन्हीमध्ये कमाल कामगिरी केली आहे. त्याने टी20 मध्ये तब्बल 155.09 च्या स्ट्राईक रेटने 411 रन केले आहेत. तर वन-डे मध्ये 94.39 च्या स्ट्राईक रेटने  387 रन केले आहेत. तर या नॉमिनीजमध्ये असणाऱ्या भारतीय गोलंदाज अर्शदीपचा विचार करता तो केवळ टी20 सामन्यांत खेळला असून यामध्ये त्याने उल्लेखणीय कामगिरी केली आहे. त्याने 8.17 च्या इकोमॉमीने आणि 13.30 च्या स्ट्राईक रेटने 33 विकेट्स घेतल्या आहेत.


हे देखील वाचा-