SRH Vs KKR Head to Head Record: सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (Sunrisers Hyderabad Vs Kolkata Knight Riders) यांच्यात आज आयपीएल 2022 मधील 25 सामना खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या (Mumbai)  ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळला जाणार आहे. या हंगामात कोलकाताच्या संघानं चांगली कामगिरी करून दाखवली आहे. कोलकात्यानं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवून सहा गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडं खराब सुरूवात करणाऱ्या हैदराबादच्या संघानं मागील दोन सामन्यात विजय मिळवून जोरदार कमबॅक केलं आहे. हैदराबादच्या संघ चार गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.


हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलमध्ये आतापर्यंत 21 सामन्यांमध्ये हैदराबाद आणि कोलकाता संघ आमनेसामने आले आहेत. या 21 सामन्यांपैकी हैदराबादनं 7 तर कोलकातानं 14 सामने जिंकले आहेत. मागील आकडेवारीच्या आधारे केकेआरचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. पण यावेळी दोन्ही संघात मोठे बदल झाले आहेत, त्यामुळे आजचा सामना कोणता संघ जिंकेल? हे सांगणं कठीण आहे.


सनराइजर्स हैदराबादचा संघ:
केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, मार्करम, निकोलस पूरण, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णु विनोद, ग्लेन फिलिप्स, आर समर्थ, शशांक सिंह, वाशिंगटन सुंदर, रोमेरियो शेफर्ड, मार्को जेनसन, जे सुचित, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन एबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फजलहक फारूकी, उमरान मलिक, टी नटराजन.


कोलकाता नाइट राइडर्स: 
फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंह, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर(कर्णधार), अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक डार, शिवम मावी, टिम साउदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन.


हे देखील वाचा-