Chennai Super Kings vs Rajasthan Royals : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगणार आहे. राजस्थानच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. राजस्थान रॉयल्स सलग दोन पराभवांनंतर आजच्या सामन्यात उतरत आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात राजस्थानला सलग पराभवाचा सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे, चेन्नई संघाने लागोपाठ तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून आपली विजयी हॅटट्रीक केली आहे. आजच्या सामन्यातही संघ विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल.


RR vs CSK, IPL 2023 Match 37 : चेन्नई आणि राजस्थान आमने-सामने


आज सवाई मानसिंग स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स संघ चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळणार आहे. या हंगामात दोन्ही संघांनी यंदाच्या मोसमात आतापर्यंत प्रत्येकी सात सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत त्यांच्या 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. चेन्नई संघ सध्या गुणतालिकेत 10 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर, राजस्थान रॉयल्सने यंदाच्या हंगामातील 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. संघ 8 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.


Sawai Mansingh Stadium Pitch Report : सवाई मानसिंग स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?


जपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी चांगली फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही या मैदानाच्या खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करेल.


CSK vs RR, Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11


CSK Probable Playing 11 : लखनौ संभाव्य प्लेईंग 11 


डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, आकाश सिंह.


RR Probable Playing 11 : राजस्थान संभाव्य प्लेईंग 11


जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, जेसन होल्डर, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


CSK vs RR Match Preview : धोनी विरुद्ध सॅमसन, जयपूरमध्ये रंगणार चुरशीची लढत; हेड टू हेड आकडेवारी पाहा