IPL 2024, SRH VS LSG : आयपीएल 2024 आता ऐन रंगात आली आहे. साखळी फेरीतील फक्त 15 सामने शिल्लक आहेत. बुधवारी सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. हैदराबाद आणि लखनौ संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघाला विजय गरजेचा आहे.  पण आता दोन्ही संघांसाठी अतिशय वाईट बातमी आली आहे. हैदराबादमध्ये जोरदार पाऊस झालाय, याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.


SRH vs LSG हा सामना हैदराबादमधील उप्पल स्टेडियमवर पार पडणार आहे. पण मंगळवारी हैदराबादमध्ये जोरदार पाऊस झालाय. मैदानावर पाणीच पाणी झाल्याचं समोर आलेय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उप्पल स्टेडियमची खेळपट्टी कव्हर्सने झाकण्यात आली आहे. पण जोरदार पावसामुळे मैदानात पाणीच पाणी झाले आहे. हैदराबादमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बुधवारीही हैदराबादमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आला आहे. पावसाने विश्रांती घेतली नाही, तर हैदराबाद आणि लखनौ यांच्यातील सामना रद्द होऊ शकतो. मैदानावर पावसामुळे पाणीच पाणी झाले आहे. 






 दोन्ही संघाला एक एक गुण


पावसामुळे हैदराबाद आणि लखनौ यांच्यातील सामना रद्द झाला तर दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. जर हैदराबाद आणि लखनौ यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर आयपीएलमधील प्लेऑफची लढत अधिक रंगतदार होणार आहे. हैदराबाद आणि लखनौ संघाने यंदाच्या हंगामात प्रत्येकी 11 सामने झाले आहेत. दोन्ही संघाच्या नावावर प्रत्येकी 12 - 12 गुण आहेत. पण हैदराबादचा रनरेट सरस असल्यामुळे ते टॉप 4 मध्ये आहेत. लखनौचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. जर सामना रद्द झाला तर दोन्ही संघाचे प्रत्येकी 13-13 गुण होतील. जर असं झालं तर चेन्नईच्या संघाला फटका बसणार आहे. कारण, हैदराबाद आणि लखनौ संघ टॉप 4 मध्ये एन्ट्री करतील. तर चेन्नईचा संघ पाचव्या क्रमांकावर घसरणार आहे. 


चेन्नईचं टेन्शन वाढलं - 


आयपीएल 2024 सध्या रोमांचक स्थितीमध्ये पोहचलाय. प्रत्येक सामन्यागणिक गणित बदलत आहेत. बुधवारी हैदराबाद आणि लखनौ यांच्यातील सामना रद्द झाला तर चेन्नईला फटका बसणार आहे. कारण, चेन्नईची गुणतालिकेत घसरण होणार आहे. त्याशिवाय पुढील आव्हानही खडतर होणार आहे. कारण, राजस्थान आणि कोलकाता संघ आधीच अव्वल स्थानावर आहेत. जर लखनौ आणि हैदराबादचा एक एक सामना रद्द झाला. त्यानंतर त्यांनी दोन सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे 17 गुण होतील. आशा स्थितीमध्ये चेन्नई प्लेऑफमध्ये पात्र होऊ शकत नाही. कारण चेन्नईने उर्वरित सर्व सामने जिंकले तर त्यांचे 16 गुण होऊ शकतात. त्यामुळे सामना हौदराबाद आणि लखनौ यांच्यातील पण नजर चेन्नईच्या संघाची असेल.