PL 2024 : आयपीएल 2024 हंगाम आता हळूहळू उत्तार्धाकडे झुकत आहे. आतापर्यंत 55 सामने झालेत, साखळी फेरीतील सामने आता संपण्याच्या मार्गावर आहेत. 15 सामन्यानंतर प्लेऑफचे सामने खेळवले जातील. 26 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामात अनेक दिग्गज खेळत आहेत. पण पुढील हंगामात काही खेळाडू दिसणार नाहीत. एमएस धोनी याच्यासह 10 दिग्गज खेळाडू पुढील हंगामात दिसणार नाहीत. रिपोर्ट्सनुसार, या दहा खेळाडूंचा हा अखेरचा आयपीएल हंगाम असेल. वय, फिटनेस आणि कामगिरीमुळे हे खेळाडू आयपीएलमधून निवृत्ती घेऊ शकतात, किंवा कोणताही संघ त्यांना संधी देणार नाही. पुढील आयपीएल हंगामाआधी आयपीएलचा मेगा लिलाव पार पडणार आहे. ठरावीक खेळाडू वगळता संपूर्ण खेळाडू लिलावात दिसतील. त्यामुळे यंदाच्या हंगामातील अनेक दिग्गज पुढील हंगामात खेळताना दिसणार नाहीत. यामध्ये एमएस धोनी आणि दिनेश कार्तिक यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
एमएस धोनीचा अखेरचा हंगाम ?
42 वर्षीय एमएस धोनीचा यंदाचा अखेरचा हंगाम असण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे धोनी त्रस्त आहे. 2023 आणि 2024 चा हंगामही दुखपत असताना धोनी खेळत आहे. त्यामुळे पुढील हंगामात धोनी खेळण्याची शक्यता कमीच आहे. एमएस धोनीशिवाय दिनेश कार्तिक, ईशांत शर्मा, डेविड वॉर्नर, अंजिक्य रहाणे, मनीष पांडे आणि वृद्धीमान साहा यासारखे दिग्गजांचा हा अखेरचा हंगाम असेल. दिनेश कार्तिक, ईशांत शर्मा, डेविड वॉर्नर, अंजिक्य रहाणे, मनीष पांडे आणि वृद्धीमान साहा हे वय आणि फिटनेसमुळे आयपीएलमधून माघार घेऊ शकतात. दिनेश कार्तिक 39, ईशांत शर्मा 35, डेविड वॉर्नर 38, अजिंक्य रहाणे 35 मनिष पांडे 34 आणि साहा 39 वर्षाचे आहेत.
या दिग्गजांचा अखेरचा हंगाम ?
त्याशिवाय मोहित शर्मा, आर. अश्विन, विजय शंकर आणि उमेश यादव यांचाही हा अखेरचा आयपीएल हंगाम असेलच. हे खेळाडू फिटनेसशिवाय खराब फॉर्ममध्येही आहेत. त्यामुळे या खेळाडूंचा हा अखेरचा हंगाम असेल असं म्हटले जातेय. यंदाच्या हंगामानंतर अनेक दिग्गज आयपीएलमधून आराम घेऊ शकतात. मोहित शर्मा 35, अश्विन 37 आणि विजय शंकर 33 वर्षाचा आहे. फॉर्म आणि वय पाहाता हे खेळाडू पुढील हंगामात दिसण्याची शक्यता आहे.
आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव पार पडणार आहे. त्यासाठी सर्व संघाचा ठरावीक खेळाडू ठेवून इतरांना रिलिज करावे लागणार आहेत. त्यामुळे अनेक युवा खेळाडूंना संधी मिळू शकते.