DC vs KKR: आज आयपीएलच्या (IPL 2022)41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हे संघ मैदानात उतरणार आहेत. गुणतालिकेचा विचार करता दिल्ली कॅपिटल्सने 7 पैकी 3 सामने जिंकत 6 गुणांसह सातवं स्थान मिळवलं आहे. तर आठव्या स्थानावर असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 8 पैकी 3 सामने जिंकत सहाच गुण मिळवले आहेत. आज होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडूंची फौज मैदानात उतरणार यात शंका नाही. दरम्यान यावेळी केकेआरचा सुनील आणि दिल्लीचा अक्षर एक मोठा विक्रम रचू शकतात.


कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार खेळाडू सुनील आजच्या सामन्यात त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 150 विकेट्स पूर्ण करु शकतो. अशी कामगिरी करणारा तो नववा खेळाडू बनू शकतो. नारायणने आतापर्यंत 142 सामन्यात 149 विकेट्स घेतल्या आहेत. 19 रन देत 5 विकेट्स घेणं हे त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे. त्यामुळे केवळ एक विकेट घेऊन जतो 150 विकेट्स पूर्ण करु शकतो. दुसरीकडे दिल्लीचा अष्टपैलू खेळआडू अक्षर पटेल हा देखील आज एका मोठ्या रेकॉर्डला गवसणी घालू शकतो तो आज केवळ दोन विकेट्स घेऊन आयपीएलमधील विकेट्सचं शतक पूर्ण करु शकतो. त्याने आतापर्यंतक 116 सामन्यात 98 विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी 21 रन देत 4 विकेट्स घेणं हे त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ठरलं आहे. विशेष म्हणजे त्याने आयपीएलमध्ये 1 हजारहून अधिक रनही केले असून 44 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.


आजच्या सामन्यात अशी असू शकते संभाव्य अंतिम 11  


दिल्ली - ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ललित यादव, रोवमन पोवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, शार्दूल ठाकूर. 


कोलकाता - वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), रिंकू सिंग, सुनील नारायण, टीम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती 


हे देखील वाचा-