IPL 2024 CSK CEO Kasi on MS Dhoni Retirement: आयपीएल 2024 च्या हंगामातील अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईतील चेपॉक मैदानावर होणार आहे. मात्र चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफमधून बाहेर गेल्यानं चाहते निराश झाले आहेत. हंगाम संपल्यानंतर 'माही' म्हणजेच एमएस धोनी (MS Dhoni) आयपीएल 2025 मध्ये खेळणार की नाही, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. एमएस धोनी पुढील वर्षी आयपीएल खेळणार की नाही, याबाबत आता चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी भाष्य केलं आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या निवृत्तीवर स्पष्टीकरण दिलं आहे. (CSK CEO Kasi on MS Dhoni Retirement)
आयपीएल 2025 मध्ये 'हेलिकॉप्टर शॉर्ट' पुन्हा दिसणार का? (CSK CEO Kasi on MS Dhoni Retirement)
या मुलाखतीत आयपीएल 2025 मध्ये 'हेलिकॉप्टर शॉर्ट' पुन्हा दिसणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर फक्त धोनीच हा निर्णय घेऊ शकतो. आम्ही नेहमी त्याच्या निर्णयाचा आदर करतो. आशा आहे की तो लवकरच निर्णय घेईल. मात्र, तो पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळेल अशी आम्हाला खूप आशा आहे, आणि ही चाहत्यांची आणि माझीही इच्छा आहे, असं काशी विश्वनाथन म्हणाले.
स्टीफन फ्लेमिंग भारतीय संघाचे प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल करणार?
स्टीफन फ्लेमिंग भारतीय संघाचे प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत का?. असे प्रश्न मला विचारण्यात आले. यानंतर मी स्टीफन फ्लेमिंगला गंमतीत विचारले की, तुम्ही भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे का?, यावर स्मितहास्य करत तुम्हाला वाटतं का मी अर्ज दाखल करु?, असा प्रतिप्रश्न स्टीफन फ्लेमिंग यांनी काशी विश्वनाथन यांना विचारला. तसेच स्टीफन फ्लेमिंग अर्ज दाखल करणार नाही, असं मला वाटतं. कारण त्यांना 10 महिने व्यस्त राहणे आवडत नाही, असा खुलासाही काशी
ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद-
विशेष म्हणजे यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीलाच धोनीने कर्णधारपद सोडले आणि युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवले. गायकवाडनेही चमकदार कामगिरी केली. चेन्नईचा संघ जरी प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नाही. चेन्नईला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
2024 च्या आयपीएलमध्ये स्फोटक फलंदाजी-
IPL 2024 मध्ये, एमएस धोनी दुखापतीमुळे मोठी खेळी खेळण्यासाठी मैदानात उतरू शकला नाही. धोनी फक्त शेवटचे 12 किंवा 10 चेंडू खेळायला यायचा. मात्र या छोट्या खेळीत त्याने स्फोटक फलंदाजी केली. आयपीएल 2024 मध्ये, एमएस धोनीने 14 सामन्यांमध्ये 220.55 च्या स्ट्राइक रेटने 161 धावा केल्या. ज्यामध्ये 14 चौकार आणि 13 षटकारांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या:
आतापर्यंत तीन दिग्गजांनी धुडकावला भारतीय प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव; फक्त 5 दिवस राहिले शिल्लक