SRH Kavya Maran: सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना पाहण्यासाठी आली होती. काव्याच्या हैदराबाद संघाने चमकदार कामगिरी करत मुंबईचा 31 धावांनी पराभव केला. यासह हैदराबादने आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्याही केली.


सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर काव्या मारन खूप आनंदी दिसत होती. विजयानंतर तिने खेळाडूंचे अभिनंदन देखील केले. हैदराबादच्या विजयानंतर त्याने खेळाडूंचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला. काव्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. मुंबईच्या जशा विकेट्स जात होत्या तशी काव्या मारन नाचतानाही दिसली. 


सोशल मीडियावर सध्या काव्याचे फोटो चर्चेत आले आहेत. नेटिझन्स तिच्या फोटोवर अनेक कमेंट्स करत आहेत. काव्या मारन या सन ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. सनराइजर्स हैदराबाद टीमची मालकी सन ग्रुपकडे आहे. काव्या पहिल्यांदा 2018 मध्ये सनराइजर्स हैदराबाद टीमला चिअर करण्यासाठी स्टेडिअमला आली होती. काव्या सध्या सन टीव्ही नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्ट Sun NXT ची प्रमुख आहे. काव्याला क्रिकेट खूप आवडतं. 






कोण आहे काव्या मारन?


काव्या मारनचा जन्म 6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नईमध्ये झाला. 33 वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. काव्याची एकूण संपत्ती 409 कोटी रुपये आहे. काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते. 


हैदराबादने उभारली सर्वात मोठी धावसंख्या-


आयपीएल 2024 च्या हंगामातील पहिल्याच सामन्यात हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्सने 4 धावांनी पराभूत केले. पण हैदराबादने शानदार पुनरागमन करत मुंबईविरुद्ध विजय मिळवला. हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी 277 धावसंख्या उभारली. यादरम्यान हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी चमकदार कामगिरी केली. क्लासेनने नाबाद 80 धावा केल्या. अभिषेकने 63 आणि हेडने 62 धावांचे योगदान दिले.


संबंधित बातम्या:


मुजीब उर रहमानची आयपीएलमधून माघार; केशव महाराजने टीम बदलली, पाहा महत्वाची अपडेट


DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....


Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video