Mumbai Indians Vs Sunrise Hyadrabad: मुंबई इंडियन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्माने आक्रमक खेळी खेळत अवघ्या 16 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने मुंबईविरुद्ध 274 च्या स्ट्राइक रेटने 23 चेंडू खेळून 63 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकारही मारले.
अभिषेक शर्माच्या या खेळीवर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगने एक्सवर (आधीचे ट्विटर) पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. युवराजने अनोख्या पद्धतीने अभिषेकचे कौतुक केले आहे. वाह सर अभिषेक वाह…अप्रतिम खेळी खेळली पण आऊट झालेल्या शॉट काय मारलास. आता एक खास चप्पल तुझी वाट पाहत आहे, असं युवराजने पोस्टद्वारे म्हटलं आहे.
अभिषेक आणि युवराज सिंगची चांगली मैत्री-
अभिषेक आणि युवराज सिंगची चांगली मैत्री आहे. युवराज सिंग हा अभिषेक शर्माचा मेंटर आहे. अंडर-19 पासून अभिषेक युवराज सिंगसोबत प्रशिक्षण घेत आहे.अभिषेक शर्मा मूळचा पंजाबमधील आहे, त्यामुळे त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याला युवराजची खूप साथ मिळाली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023-2024 मध्ये अभिषेकने एकूण 485 धावा केल्या होत्या आणि पंजाबमध्ये ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय अभिषेकने युवराज सिंगला दिले होते.
आधी ट्रॅव्हिस हेडनंतर अभिषेक शर्माने विक्रम मोडला-
हैदराबाद आणि मुंबईच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. जो त्याने 2015 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध केला होता. पण नुकत्याच झालेल्या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने 18 चेंडूत 50 धावा पूर्ण करत एसआरएचसाठी सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला. अभिषेक शर्माने अवघ्या 16 चेंडूत 50 धावा पूर्ण करत वेगवान अर्धशतकांचा विक्रम मोडीत काढत हा विक्रम मोडून अवघ्या काही मिनिटांचा कालावधी लोटला होता.
संबंधित बातम्या:
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video