IPL 2024: आयपीएल 2024 मधील खेळाडूंच्या दुखापतींची मालिका संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब-उर-रहमान दुखापतीमुळे आयपीएल 2024 च्या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे. त्याच्या जागी कोलकाता नाईट रायडर्सने अफगाणिस्तानचा 16 वर्षीय ऑफस्पिन गोलंदाज अल्लाह गझनफरला आपल्या संघात सामील केले आहे. 


गझनफरने आतापर्यंत 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. गझनफर याआधी 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक 2024 मध्ये अफगाणिस्तानकडून खेळताना दिसला होता. आतापर्यंत त्याने आपल्या कारकिर्दीत 3 टी-20 सामने आणि 6 लिस्ट-ए सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 5 आणि 4 विकेट घेतल्या आहेत. केकेआरने गझनफरला त्याच्या मूळ किंमती म्हणजेच 20 लाख रुपयांसाठी करारबद्ध केले आहे.


मुजीब-उर-रहमानबद्दल सांगायचे तर, तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जकडून खेळला आहे, परंतु 2024 च्या लिलावात केकेआरने त्याला 2 कोटी रुपयांना विकत घेतले. मुजीब 2021 नंतर आयपीएलमध्ये खेळला नाही, परंतु दुखापतीमुळे त्याला यावेळीही बाहेर बसावे लागले. आता अल्लाह गझनफर त्याच्या जागी काय चमत्कार दाखवू शकतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.






राजस्थान रॉयल्सनेही मोठा बदल केला


दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या संघातही मोठा बदल पाहायला मिळाला आहे. हा सलग दुसरा हंगामात प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी राजस्थानने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू केशव महाराजला आपल्या संघात सामील केले आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे महाराजवरही शस्त्रक्रिया करावी लागली आणि सध्या ते त्यातून सावरत आहेत. आयपीएल 2024 साठी तो लखनऊ सुपर जायंट्ससोबत होता, पण आता तो राजस्थानकडून खेळताना दिसणार आहे. 


केशव महाराजची कारकीर्द-


केशव महाराजने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 27 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 671 धावा करण्याव्यतिरिक्त 24 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1,686 धावा आणि 55 विकेट आहेत. जर आपण त्याच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 50 सामने खेळले आहेत आणि 5,055 धावा केल्या आहेत आणि 158 बळीही घेतले आहेत.


संबंधित बातम्या:


DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....


Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video