MI vs SRH 2024:  सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना पाहण्यासाठी आली होती. काव्याच्या हैदराबाद संघाने चमकदार कामगिरी करत मुंबईचा 31 धावांनी पराभव केला. यासह हैदराबादने आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्याही केली.


सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर काव्या मारन खूप आनंदी दिसत होती. विजयानंतर तिने खेळाडूंचे अभिनंदन देखील केले. हैदराबादच्या विजयानंतर त्याने खेळाडूंचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला. काव्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.






काव्या अनेकदा हैदराबादमध्ये सामने पाहण्यासाठी येत असते. राजीव गांधी स्टेडियममध्ये मुंबई आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या ऐतिहासिक सामन्यावेळी ती उपस्थित होती. सामन्यादरम्यान तिने खेळाडूंना प्रोत्साहनही दिले. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला बाद केल्याने काव्याही खूप खूश होती. मुंबईच्या जशा विकेट्स जात होत्या तशी काव्या मारन नाचतानाही दिसली. 






हैदराबादने उभारली सर्वात मोठी धावसंख्या-


आयपीएल 2024 च्या हंगामातील पहिल्याच सामन्यात हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्सने 4 धावांनी पराभूत केले. पण हैदराबादने शानदार पुनरागमन करत मुंबईविरुद्ध विजय मिळवला. हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी 277 धावसंख्या उभारली. यादरम्यान हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी चमकदार कामगिरी केली. क्लासेनने नाबाद 80 धावा केल्या. अभिषेकने 63 आणि हेडने 62 धावांचे योगदान दिले.


मुंबई कमबॅक करणार?


मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या विरोधात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी या सामन्यांमधील पराभव एकतर्फी झालेला नव्हता. मुंबईचा पराभव अटतटीच्या लढतीत झाला. गुजरात विरुद्ध मुंबईचा पराभव 6 धावांनी झाला होता. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबईचा पराभव 31 धावांनी झाला आहे. हैदराबादनं 3 विकेटवर 277 धावा केलेल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 6 विकेटवर 246 धावा करु शकला. म्हणजेच मुंबईनं दोन्ही मॅचमध्ये अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारला आहे. त्यामुळं आगामी सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स कमबॅक करेल अशी आशा मुंबईच्या चाहत्यांना आहे.


कोण आहे काव्या मारन?


काव्या मारनचा जन्म 6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नईमध्ये झाला. 33 वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते. 


संबंधित बातमी:


RR Vs DC Dream11 prediction: जैस्वाल, बटलर, वॉर्नर, कोणाला बनवाल कर्णधार?; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल