Shreyas Iyer Injury Update: आयपीएलचा (IPL 2023) आगामी सीझन 31 मार्चपासून सुरु होत आहे, परंतु त्याआधी कोलकाता नाइट रायडर्सला (Kolkata Knight Riders) मोठा धक्का बसला आहे. किंग खानची टीम कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आयपीएल 2023 मधून बाहेर पडू शकतो. दुखापतीमुळे श्रेयसच्या आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यर आगामी आयपीएल सीझन आणि WTC फायनलमध्ये संघाबाहेर राहू शकतो. 


अहमदाबाद कसोटीतही श्रेयस अय्यर फलंदाजीला आला नव्हता. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत सातत्याने तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता कोलकाता नाईट रायडर्ससाठी एक टेन्शन वाढवणारी माहिती समोर येत आहे. कोलकाताचा स्टार कर्णधार आणि धडाकेबाज युवा फलंदाज दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर राहू शकतो. असं झाल्यास कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा मोठा धक्का असेल. असं झालंच तर, श्रेयसच्या अनुपस्थितीत संघाची धुरा कोण सांभाळणार? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 


श्रेयस अय्यरला फिट होण्यासाठी वेळ लागेल : रोहित शर्मा


अहमदाबाद कसोटीनंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत माध्यमांना माहिती दिली. तो म्हणाला की, "श्रेयस अय्यर सध्या पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे. श्रेयस अय्यरला तंदुरुस्त होण्यासाठी आणखी वेळ लागेल." रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे.


आयपीएल 2023 31 मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएल सुरु होण्यासाठी सुमारे फक्त दोनच आठवडे शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर आयपीएलपर्यंत तंदुरुस्त होण्याची शक्यता कमीच असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे तो आयपीएलमधून माघार घेऊ शकतो, असं मानलं जात आहे. 


श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर 


बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 मार्च रोजी मुंबईत होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यर दुखापतीमुळे खेळताना दिसणार नाही, हे आता जवळपास निश्चितच झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात जवळपास 167 षटके क्षेत्ररक्षण केल्यानंतर श्रेयस अय्यर दुखापतीला बळी पडला. यामुळे तो फलंदाजीलाही येऊ शकला नाही. तसेच, आता असं म्हटलं जात आहे की श्रेयस अय्यर आयपीएल 2023 च्या संपूर्ण हंगामापासून दूर राहू शकतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IND vs AUS : टीम इंडियाला मोठा धक्का, श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त; ऑस्ट्रेलियाविरोधात खेळण्यावर प्रश्नचिन्ह