Shikhar Dhawan and Mohit Rathee : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) पंजाब किंग्स संघाचा (Punjab Kings) कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) मोहित राठीसोबत (Mohit Rathee) खेळून इतिहास रचला आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात दोघांनी दहाव्या विकेटसाठी 50 हून अधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दहाव्या विकेटसाठी एवढी मोठी भागीदारी केली. पंजाब किंग्सला आईपीएल 2023 च्या तिसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या दोघांची भागीदारी व्यर्थ गेली पण, त्यांनी विक्रम रचला आहे. 


मोहित राठीसोबत शिखर धवनने रचला इतिहास


पंजाब किंग्सला आईपीएल 2023 च्या तिसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. कोलकाता आणि राजस्थानला पराभूत करणाऱ्या पंजाब संघाने हैदराबादविरुद्धचा सामना हैदराबादच्याच घरच्या भूमीवर गमावला. मात्र, या सामन्यात शिखर धवनने दमदार फलंदाजी करताना नाबाद 99 धावा केल्या. या सामन्यात पंजाब किंग्स संघाने धावसंख्या 143 धावा केल्या. यादरम्यान मोहित राठीसोबत मिळून शिखर धवनने इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात दहाव्या विकेट त्यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी केली आहे. 






आयपीएलच्या इतिहास पहिल्यांदाच दहाव्या विकेटसाठी मोठी भागीदारी


आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच दहाव्या विकेटसाठी 50 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी झाली आहे. शिखर धवन आणि मोहित राठी यांनी दहाव्या विकेटसाठी अवघ्या 30 चेंडूत 55 धावा केल्या. त्यापैकी एक धाव मोहित राठीच्या बॅटमधून निघाली, तर शिखर धवनने 50 हून अधिक धावा केल्या. काही धावा अतिरिक्त होत्या. अशाप्रकारे आयपीएलमध्ये पहिल्यांदाच शेवटच्या विकेटआधी मोठी भागीदारी पाहायला मिळाली. 


शिखर धवनची नाबाद 99 धावांची खेळी


पंजाबचा संघ 100 धावांचा टप्पा पार करू शकणार नाही असं वाटत होतं, कारण 88 धावांत 9 विकेट पडल्या होत्या. पण शिखर धवन आणि मोहित राठी यांची शेवटच्या चेंडूपर्यंत शर्थीची झुंज दिली. या सामन्यात धवनने 66 चेंडूत नाबाद 99 धावा केल्या आणि मोहित राठीने दोन चेंडूत एक धाव काढली. मोहित राठीने धवनला शेवटच्या चेंडूपर्यंत चांगली साथ दिली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : ''झूमे जो रिंकू, माय बेबी...'' कोलकाताच्या विजयाचा 'बादशाह' रिंकू सिंहचं 'किंग खान'कडून कौतुक; खास पोस्ट शेअर करत म्हणाला..