Shah Rukh Khan Special Post For Rinku Singh : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएलमधील अत्यंत रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) तीन विकेट्सने पराभव केला आहे. कोलकाताचा फलंदाज रिंकू सिंह (Rinku Singh) याने अखेरच्या षटकात सलग पाच षटकार ठोकून विजयी खेळी केली आणि गुजरात टायटन्सच्या तोंडचा घास पळवला. 25 वर्षीय रिंकू सिंहच्या या धमाकेदार खेळीनं सारेच अवाक झाले. आयपीएलच्या (IPL 2023) इतिहासात पहिल्यांदाच शेवटच्या षटकात संघाने सर्वाधिक धावा करत लक्ष्य गाठलं आहे.


रिंकू सिंहने गुजरात टायटन्सच्या (Gujrat Titans) गोलंदाजाला अक्षरक्ष: झोडपून काढलं. यश दयालच्या चेंडूवर रिंकूने सलग पाच षटकार ठोकले. यामुळे कोलकाताला गुजरातवर तीन विकेट्सने विजय मिळवला. रिंकूच्या जीवावर कोलकाता नाईट रायडर्सने हा सामना जिंकला. यानंतर सर्वांकडूनच रिंकू सिंहचं कौतुक होत आहे. केकेआर संघाचा मालक अभिनेता शाहरुख खान यानं रिंकूचं कौतुक केलंय. 'किंग खान'नं षटकारांच्या 'बादशाह'साठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.


शाहरुखने फिल्मी अंदाजात खास पोस्ट शेअर करत लिहिलंय, ''माय बेबी रिंकू सिंह, नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर! आणि लक्षात ठेवा, विश्वासावर सर्व काही अबलंबून आहे. केकेआर आणि वेंकी म्हैसूर यांचं अभिनंदन, काळजी घ्या सर.'' या ट्वीटला रिट्विट करत रिंकूनं शाहरुखचे आभार मानले आहेत.''






टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानंही ट्वीट करत कौतुक केलं आहे.






माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहकडूनही कौतुक






इंग्लंड टेस्ट टीमचा कर्णधार बेन स्टोक्सकडूनही रिंकूचं अभिनंदन






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rinku Singh IPL 2023 : छक्के पे छक्का! रिंकू सिंहकडून सलग पाच षटकार, धावांचा पाऊस; कोलकातासमोर गुजरात फेल