IPL 2023 Final, CSK vs GT : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) महाअंतिम सामन्यात चेन्नईचा कर्णधार धोनीने (CSK) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गिल थोडक्यात बाद झाला पण, साई सुदर्शन याच्या झंझावाती 96 धावांच्या बळावर गुजरातने 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 214 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात गुजरातचा पराभव झाला असला तरी, साई सुदर्शननं अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.


साईची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी


साईनं चेन्नईच्या गोलंदाजांना अक्षरक्ष: धुतलं. साई सुदर्शननं या सामन्यात 96 धावांची खेळी आयपीएलच्या इतिहासातील अनकॅप्ड खेळाडूनं केलेली सर्वाधिक धावांची खेळी आहे. शुभमन गिल बाद झाल्यावर गुजरात अंतिम सामन्यातून बाहेर गेला, असं वाचत असताना साईनं गुजरातचं आव्हान कायम ठेवलं. साई सुदर्शननं 47 चेंडूत 96 धावा ठोकत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. चेन्नई संघानं शुभमन गिलसाठी तयारी केली असताना, त्यांच्यासमोर पेपर मात्र साई सुदर्शनचा आला, अशी परिस्थिती अंतिम सामन्यात पाहायला मिळाली. 


साई सुदर्शनच्या नावे नवा विक्रम


गुजरातच्या साई सुदर्शनने 47 चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 96 धावांची खेळी केली. सुदर्शन आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील दुसरा सर्वाधिक अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. अनकॅप्ड म्हणजे असा खेळाडू ज्याने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.


अनकॅप्ड साईची अंतिम सामन्यात झंझावाती खेळी


नरेंद्र मोदी स्टेडिअवर गुजरातच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी वादळी सुरुवात केली. शुभमन गिल याने 20 चेंडूत 39 धावांवर बाद झाला. पण यानंतर अवघ्या 21 वर्षांच्या साईनं गुजरातची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. गिलनंतर साई सुदर्शननं गुजरातची बाजू सांभाळत चेन्नईच्या गोलंदाजांची नाकी नऊ आणली.


अंतिम सामन्यात सर्वाधिक खेळी करणारे अनकॅप्ड खेळाडू



  • साई सुदर्शन : 96 धावा (गुजरात विरुद्ध चेन्नई, 2023)

  • मनिष पांडे : 94 धावा (कोलकाता विरुद्ध पंजाब आयपीएल, 2014)

  • मनविंदर बिस्ला : 89 धावा (कोलकाता विरुद्ध चेन्नई, आयपीएल 2012)

  • मोहन वोहरा : 67 धावा (पंजाब विरुद्ध कोलकाता, आयपीएल 2014)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Sai Sudharsan vs Ravindra Jadeja: IPL फायनलचा अनोखा योगायोग, तमिळी साईने चेन्नईला धुतलं, गुजराती जाडेजाने गुजरातला हरवलं!