CSK Beat GT in IPL 2023 Final : चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) आयपीएल 2023 च्या (IPL 2023) अंतिम सामन्यामध्ये गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) पराभव करून इतिहास रचला. चेन्नई सुपर किंग्सनं पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. गतविजेत्या गुजरात टायटन्सला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातने अंतिम फेरीत चांगली कामगिरी केली पण, चेन्नईचे खेळाडूं टायटन्सवर भारी पडले. चेन्नईने अनुभवी खेळाडूंच्या जोरावर हातातून निसटलेला अंतिम सामना जिंकला. पराभवानंतर गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने म्हटलं की, 'नशिबात हेच लिहिलं होतं'. त्याने चेन्नईच्या खेळाडूंचं कौतुकही केलं.


चेन्नईकडून पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया


सामन्यानंतर हार्दिक पांड्यानं प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ''आजची रात्र धोनीची होती. मी त्याच्यासाठी खूप खशू आहे. नशिबात हेच लिहिलं आहे, की मी हरणार आहे तर तसंच घडतं. चांगल्या लोकांसोबत चांगल्या गोष्टी घडतात आणि मला माहित आहे की धोनी खूप चांगला व्यक्ती आहे. देवानं माझ्यासाठीही काही लिहिलं असेल पण, आजची रात्र त्यांची रात्र होती."




IPL 2023 : 'नशिबात हेच लिहिलं होतं',


पांड्यानं पुढे म्हटलं की, '“मला वाटतं की एक संघ म्हणून आम्ही खूप काही करतो. आम्ही खूप मनापासून खेळलो, आम्ही ज्या प्रकारे लढलो त्याचा मला खरोखर अभिमान आहे. आमचं ब्रीदवाक्य ही असंच आहे,  आम्ही एकत्र जिंकतो, आम्ही एकत्र हरतो. मी कोणतंही कारण देणार नाही, पण चेन्नई संघ आज चांगलं खेळला. आम्ही चांगली फलंदाजी केली, विशेषत: साई सुदर्शननं. या स्तरावर अशाप्रकारे खेळणं सोपं नाही.''


चेन्नईनं पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन


नाणेफक जिंकून चेन्नईनं गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरात संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 214 धावा केल्या. पावसामधे ख्वाडा घातल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नई संघाला 171 धावांचं लक्ष्य मिळाले. चेन्नईनं शेवटच्या चेंडूवर पाच विकेट्स गमावून सामना जिंकला. चेन्नईच्या डावात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना अतिशय रंजक राहिला. शेवटच्या चेंडूवर जडेजाच्या चौकारासर अखेर चेन्नई सुपर किंग्स अंतिम सामना जिंकून पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन ठरला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : पराभवानंतरही आयपीएलमध्ये गुजरातची ऐतिहासिक कामगिरी, अंतिम सामन्यात सर्वाधिक धावांसह इतरही विक्रम नावावर